आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींचा पुतळा पेटवणे महागात पडले, काँग्रेसचे तीन कार्यकर्ते भाजले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदीगड - हिमाचलप्रदेशची राजधानी शिमलामध्‍ये कॉंग्रसच्‍या कार्यकर्त्‍यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिकात्‍मक पुतळा जाळणे महागात पडले. मोदींच्‍या प्रतिकात्‍मक पुतळ्याला आग लावताना कॉंग्रेसचे तीन कार्यकर्ते भाजले आहेत. या तिघांनाही शिमलाच्‍या स्टेट हॉस्पिटलमध्‍ये उपचारासाठी दाखल करण्‍यात आले आहे.
जखमी कार्यकर्त्यांमध्‍ये महिलेचा समावेश
-शिमलामध्‍ये जेव्‍हा कॉंग्रेसचे कार्यकर्ते मोदी यांचा प्रतिकात्‍मक पुतळा पेळवत होते. तेव्‍हा अचानक हे तिघे आगीच्‍या भडक्‍यात सापडले. यामध्‍ये एका महिला कार्यकर्तीचाही समावेश आहे.
का केले होते आंदोलनाचे आयोजन?
-राजकीय सूड भावनेतून वरीष्‍ठ नेत्‍यांवर कारवाई केली जात आहे, असा आरोप करणा-या कॉंग्रेसच्‍या कार्यकर्त्‍यांनी मोदी सरकारचा निषेध केला.
- या कारणामुळे कॉंग्रेसने सोमवारी हिमाचल प्रदेशातील सर्व जिल्‍ह्यात धरणे आंदोलनाचे आयोजन केले होते. ठिकठिकाणी कार्यकर्त्‍यांचा मोठ्या प्रमाणात या आंदोलनाला प्रतिसाद लाभला.
-आंदोलनात केंद्र सरकारचा विरोध करण्‍यासाठी पंतप्रधानांचा प्रतिकात्‍मक पुतळा पेटवण्‍यात आला.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटो..
बातम्या आणखी आहेत...