आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅरेज रिसेप्शनमध्ये माथेफिरुंचा गोळीबार, चिमुकल्याच्या डोक्यात लागली गोळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोरखपूर (उत्तर प्रदेश)- येथील कॅंटोनमेंट परिसरात मोठ्या धुमधडाक्यात लग्नाचे रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते. त्याचा उत्साह प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होता. पण अचानक सर्वांचा आनंद दुःखात बदलला. त्याचे झाले असे, की लग्नाच्या वेळी आनंदाच्या भरात हवेत गोळीबार करण्यात आला. यातील एक गोळी नवरदेवाच्या 10 वर्षीय पुतण्याला लागली. हे बघून मुलाची आई आणि नवरी जागीच बेशुद्ध होऊन पडल्या. गोळी लागल्याने गंभीर जखमी झालेल्या मुलाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
असे आहे संपूर्ण प्रकरण
- गोरखपुरच्या ओमसिंहचे लग्न 9 डिसेंबर रोजी सुमनसिंह हिच्यासोबत झाले.
- 11 डिसेंबर रोजी लग्नाचे रिसेप्शन देण्यात आले. यावेळी स्टेजवर नवरदेव-नवरीसह काही गेस्ट होते.
- नवरदेवाचा मित्र दुर्गेश दुबे याच्या छोटा भाऊ दिलीप दुबे आणि त्याचा मित्र चिंटू यादव हेही यावेळी उपस्थित होते.
- स्टेजवर आल्यावर दिलीप आणि चिंदू देशी कट्टाने हवेत फायरिंग करत होते.
- स्टेजवरील लोकांनी असे करु नका असे बजावले. पण दोघे दारु घेऊन आले होते.
- दोघे लोकांचे काही एक ऐकत नव्हते. त्याचे फायरिंग करणे सुरुच होते.
- या दरम्यान दिलीपच्या देशी कट्ट्यात एक गोळी फसली.
- देशी कट्टा उघडून तो बघण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी एक गोळी फायर झाली.
- स्टेजच्या खाली उभ्या असलेला नवरदेवाचा पुतण्या श्रेयांशसिंह याच्या डोक्यात गोळी लागली. तो लगेच जमिनीवर कोसळला.
- मुलाला गोळी लागल्याचे बघून आई रंजनासिंह आणि नवरी सुमनसिंह जागेवरच बेशुद्ध होऊन पडल्या.
नवरदेवाच्या मेहुण्याच्या डोक्यावर लावली बंदूक
- या घटनेनंतर दिलीप आणि चिंटू यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.
- दोघांपैकी एकाने नवरदेवाच्या मेहुण्याच्या डोक्यावर बंदुक लावली.
- त्यानंतर स्कूटी सुरु करुन पळून गेले. नवरदेवाच्या नातलगांनी 100 क्रमांकावर फोन करुन पोलिसांना माहिती दिली.
- पोलिसांनी रात्री उशीरा दिलीप नावाच्या आरोपीला अटक केली.
पुढील स्लाईडवर बघा, या घटनेचे फोटो....
बातम्या आणखी आहेत...