आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकच्या गोळीबारात जवानासह मुलगा ठार;13 चौक्यांना केले टार्गेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू- पाकिस्तानील ष्कराने सोमवारी पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. जम्मू जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवरील अनेक सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार, उखळी तोफांचा मारा केला. गोळीबारात सहा वर्षांचा मुलगा सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) एका जवानाचा मृत्यू झाला, तर अन्य नऊ जण गंभीर जखमी झाले.
सूत्रांनुसार, पाकिस्तानी लष्कराने आर. एस. पुरा सेक्टरमधील लालियाल गावावर रविवारी रात्रभर गोळीबार केला. यातील जखमींपैकी एका महिलेची प्रकृती गंभीर आहे. जम्मू जिल्ह्यातील इतर २५ चौक्यांवरही पाकिस्तानी लष्कराने काल रात्रीपासून अंदाधुंद गोळीबार सुरू केला असून, सोमवारीही तो सुरूच होता. या गोळीबारात बीएसएफचा कॉन्स्टेबल सुशीलकुमार हा जवान हुतात्मा झाला, तर एक जण जखमी झाला. आंतरराष्ट्रीय सीमेचे संरक्षण करणारे बीएसएफचे जवान पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत आहेत, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन सर्जिकल हल्ले केले होते. त्यानंतर पाकिस्तानने आतापर्यंत तब्बल ४० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS
बातम्या आणखी आहेत...