आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मीरमधील स्थिती बिघडली: अतिरेक्याच्या अंत्ययात्रेत सामील 12 अतिरेक्यांचा गोळीबार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- काश्मीरमध्ये दिवसेंदिवस परिस्थिती चिघळत आहे. कुलगाम जिल्ह्यात तोयबाचा अतिरेकी फय्याज अहमदच्या अंत्ययात्रेत 12 अतिरेक्यांनी दहशत पसरवण्यासाठी खुलेआम गोळीबार केला. यानंतर अतिरेकी पळून गेले.

शनिवारी अतिरेक्यांनी पोलिसांवर हल्ला केला होता. चकमकीत फय्याज ठार झाला. उर्वरित अतिरेकी पळून जाण्यात यशस्वी झाले होते. गोळीबारात तीन नागरिक ठार झाले . लष्कराचे धाडसत्र सुरू असताना ही घटना घडली आहे. फय्याजवर लाखांचे इनाम होते.

अतिरेकी फय्याजवर लाख रुपयांचे इनाम होते. तो दोन वर्षांपासून फरार होता. उधमपूर अतिरेकी हल्ल्यातील सहभागावरून एनआयए त्याचा शोध घेत होते.

पुढील स्लाइडवर... काश्मीरमध्ये ठार मारले गेलेल्या अतिरेक्यांना दिली AK-47 ने सलामी, समोर आले फोटोज...
बातम्या आणखी आहेत...