फोटो - बुधवारी पहाटे करण्यात आलेल्या गोळीबारात जखमी झालेला मुलगा
नवी दिल्ली - पाकिस्तानी सैन्याकडून नियंत्रण रेषा आणि जम्मू काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर मंगळवारी रात्री आणि बुधवारी पहाटेही पाकिस्तानकडून फायरिंग सुरू होती. यात गोळीबारात सांबा गावच्या दोन महिलांचा मृत्यू झाला आहे, तर 19 जण जखमी आहेत. भारतीय सैन्यानेही प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानच्या 37 बॉर्डर पोस्टवर हल्ला केला. त्यात 15 पाकिस्तानी नागरिक ठार झाले आहेत. तर 30 हून अधिक जखमी आहेत.
भारताने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानी रेंजर्सच्या चौक्यांचेही नुकसान झाले आहे. पाकिस्तानकडून सांबा, कठुआ, अरनिया, आरएसपुरा सेक्टरमध्येही फायरिंग केले जात आहे. सद्यस्थिती पाहता, भारताने फायरिंग थांबेपर्यंत पाकिस्तानबरोबर फ्लॅग मिटींग न करण्याचा निर्णय घेतला आहे. तर पंतप्रधान
नरेंद्र मोदीही आज सायंकाळी तिन्ही सैन्यप्रमुखांशी चर्चा करणार आहेत.
पाकिस्तानने बीएसएफ (बॉर्डर सेक्युरिटी फोर्स) च्या 63 तुकड्या आणि आसपासच्या गावांना लक्ष्य केले. रात्रभर सीमेपलिकडून गोळीबार सुरू होता. त्याचबरोबर आसपासच्या 25 परिसरांमध्ये मोर्टारद्वारेही हल्ला करण्यात आला. त्यात 12 जण जखमी झाले. गुप्तचर संस्था पाकिस्तानी मिडियाच्या बातम्यांवर नजर ठेवून आहेत. त्यानुसार पाकिस्तानच्या सियालकोट सेक्टरमध्ये 15 पाकिस्तानी नागरिक ठार झाले असल्याचे वृत्त समोर आले आहे.
बीएसएफने सुमारे 1000 ते 1200 ग्रेनेडने हल्लाकरत सीमेवर पाकिस्तानी सैन्याला प्रत्युत्तर दिले आहे. परिस्थिती विचारात घेऊन संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी मंगळवारी तिन्ही सैन्यप्रमुखांबरोबर चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
पाकिस्तानची इच्छा काय?
- पाकिस्तान रहिवासी भागाला लक्ष्य करून भारताला प्रत्युत्तर देण्यास भाग पाडत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर हा मुद्दा मांडता यावा यासाठी पाक असे करत आहे.
- सीमेवर मोठ्या संख्येने दहशतवादी घुसखोरी करण्यच्या तयारीत. जम्मू-कश्मीरमध्ये होणा-या निवडणुकांत गोंधळ घालणे हा त्यांचा उद्देश आहे.
- भारताकडून परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा रद्द झाल्यानंतर पाकिस्तानचा संताप वाढलेला आहे. त्यामुळे गोळीबारातून दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे.
दीड हजार लोकांचे स्थलांतर
बीएसएफ प्रवक्ते विनोद यादव यांच्या मते पाकिस्तान रेंजर्सने सोमवारी रात्री ऊ वाजता फायरिंग सुरू केली होती. या हल्ल्यातील एक मोर्टार शेल अरनिया पोलिस ठाण्याच्या परिसरात पडला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने एखा रात्रीत सीमेवरील नागरी वस्त्यांतील सुमारे 1,500 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले.
पुढे वाचा, अरनियामधून प्रथमच स्थलांतर