आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Firing In Arnia And RS Pura Sector Of Jammu & Kashmir

J&K : पाककडून रात्रभर फायरिंग, आरएसपुरा-अरनियाला केले लक्ष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू-काश्मीरमध्ये सीमेपलिकडून पाकिस्तानी फायरिंगमध्ये सोमवारी जखमी महिलेला रुग्णालयात घेऊन जाणारे नागरिक. - Divya Marathi
जम्मू-काश्मीरमध्ये सीमेपलिकडून पाकिस्तानी फायरिंगमध्ये सोमवारी जखमी महिलेला रुग्णालयात घेऊन जाणारे नागरिक.
जम्मू - जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्रीपासून ते मंगळवारी पहाटे पाच वाजेपर्यंत पाकिस्तानी रेंजर्सनी अरनिया आणि आरएसपुरा सेक्टरमध्ये फायरिंग केली. गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारे सुरू असलेल्या फायरिंगमध्ये पाकिस्तानने सामान्य नागरिकांनाही लक्ष्य केले आहे.
सोमवारी रात्री झालेल्या फायरिंगमध्ये अरनियामध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. गेल्या आठवड्यापासून पाकिस्तानकडून रोज ठरावीक कालावधीनंतर फायरिंग केली जात आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिका-याने सांगितले की, जखमी झालेल्या रहिवाशाचे नाव सुभाष चंद्र (38) असे आहे. रात्री फायरिंगदरम्यान आरएसपुरा सेक्टरमध्ये त्याच्या पायाला गोळी लागली. जम्मूच्या सरकारी रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

कुठे कुठे झाली फायरिंग
जम्मू-काश्मीरच्या अरनियामध्ये सोमवारी रात्री 12 वाजेपासून मंगळवारी सकाळी 5 वाजेपर्यंत फायरिंग झाली. तर आरएसपुरा सेक्टरमध्ये रात्री 10 वाजेपासून सकाळी 5 पर्यंत पाकिस्तानकडून फायरिंग करण्यात आली. गेल्या आठवड्यातील गुरुवारपासून पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहेत. यापूर्वी दोन दिवस झालेल्या गोळीबारात 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
पाकिस्तानने किती वेळा केले शस्त्रसंधीचे उल्लंघन
वर्षपाकिस्तानने बॉर्डर आणि एलओसीवर किती वेळा केले शस्त्रसंधीचे उल्लंघनकिती जवान झाले शहीद
किती
नागरिकांनी
गमावले प्राण
किती लोकांवर झाला प्रभाव
2015 मध्ये आतापर्यंत
200 पेक्षा
अधिक वेळा
17218000
2014430 वेळा41262.08 लाख
गेल्या वर्षी झाली होती 44 वर्षांतील सर्वाधिक फायरिंग
गेल्या वर्षी ऑगस्टनंतर पाकिस्ताकडून करण्यात आलेल्या फायरिंगमुळे एलओसीच्या जवळपास असलेल्या गावांतील 32 हजार नागरिकांना घर सोडून जावे लागले होते. 1971 नंतर प्रथमच बॉर्डर आणि एलओसीवर पाकिस्तानकडून एवढ्या मोठ्या प्रमाणावर फायरिंग झाली होती.
इंटरनेशनल बॉर्डर आणि एलओसी..
पाकिस्तानला लागून असलेली भारताची इंटरनॅशनल बॉर्डर 2313 किलोमीटर लांबीची आहे. तर जम्मू-काश्मीरमध्ये एलओसी 772 किलोमीटर लांब आहे. इंटरनॅशनल बॉर्डरवर बीएसएफचा पहारा असतो. तर एलओसीवर आर्मीचे जवान तैनात असतात. पाकिस्तानकडून इंटरनॅशनल बॉर्डरवर बीएसएफच्या चौक्यांना जास्त प्रमाणात लक्ष्य केले जाते.
12 वर्षांपूर्वी झाली होती शस्त्रसंधी
भारत-पाकिस्तानदरम्यान सीजफायर अॅग्रीमेंट नोव्हेंबर 2003 मध्ये झाले होते. बॉर्डर आणि एलओसीवर फायरिंग करणार नाही, असे यात नमूद करण्यात आले होते. पण पाकने दरवर्षी अनेकदा या शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. यापूर्वी 1949 मध्ये कराचीमध्ये करारानंतर शस्त्रसंधी लागू करण्यात आली होती. नंतर वाजपेयी सरकारच्या काळात 2003 मध्ये पुन्हा शस्त्रसंधी लागू करण्यात आली.

पुढील स्लाइड्सवर पाहा संबंधित PHOTO