आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्तीसगडमध्ये चकमक, पोलिस अधिकारी शहीद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर - छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केंद्रीय राखीव दलाच्या तुकडीवर केलेल्या हल्ल्यात असिस्टंट कमांडंट एस. के. दास शहीद झाले. दोन जवान जखमी झाले आहेत. दरम्यान, चकमक रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास गरियाबंद जिल्ह्यात हा हल्ला झाला. दास यांच्या नेतृत्वाखाली पोलिस तसेच केंद्रीय राखीव दलाच्या 50 जवानांचे पथक नक्षलवाद्यांचा शोध घेत असताना अचानक गोळीबार सुरू झाला. दास यांच्या पोटात तसेच उजव्या पायावर गोळ्या लागल्या. उपनिरीक्षक अशोक गुप्ता यांनी त्यांना जंगलातून बाहेर काढले व दुचाकीवरून रुग्णालयात पोहचवले. मात्र, तोवर दास यांची प्राणज्योत मालवली होती.