आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉंग्रेसच्या बैठकीत गोळीबार; पक्षांच्या नेत्यांनी दिल्या एकमेंकांना धमक्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची- झारखंड प्रदेश कॉंग्रेसच्या बैठकीत शुक्रवारी दुपारी गोळीबार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. एक नाही, दोन नाही तर पूर्ण सात राऊंड करण्‍यात आल्याने एकच गोंधळ उडाला. एवढेच नाही तर पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांना धमक्याही दिल्या आहेत. गोळीबारनंतर अपर बाजारात असलेल्या कॉंग्रेस भवनातील साहित्याची भीषण तोडफोडही करण्यात आली. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बी.के.हरिप्रसाद यांनी पक्षांच्या आमदारांची बैठक बोलावली होती.

यादरम्यान धनबादचे आमदारमन्नान मल्ल्कि आणि कॉंग्रेसचे युवाअध्यक्ष अनूप सिंग यांच्यात जुंपली. अनूप सिंगहे विधानसभेचे विरोधी पक्ष नेता आणि आमदार राजेंद्र सिंग यांचे सुपुत्र आहेत. दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केल्याने त्यानंतर मारहाणही झाली. सर्वत्र गोंधळ सुरु असताना आमदार मन्नान मल्ल्कि यांच्या सुरक्षारक्षकांनी गोळीबार करण्‍यास सुरुवात केली. अनूप सिंग यांच्याकडून प्रत्युत्तरदाखल गोळीबार करण्यात आला.

गीताश्री यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन
प्रदेशाध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांनी पक्षाच्या कार्यालयात शुक्रवार गोळीबारच्या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. हरिप्रसाद यांनी या घटनेची चौकशी करण्‍यासाठी पक्षाचे राष्‍ट्रीय सचिव गीताश्री उरांव यांच्या नेतृत्त्वाखाली तीन सदस्सीय समिती स्थापन केली आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा 'गुन्हेगारासोबत आले होते आमदार मन्नान मल्ल्कि '