आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रकने मजूराला चिरडले, परिसरात तणाव व अंधाधुंद गोळीबार, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लुधियाणा- एका दुचाकीस्‍वार मजूराला ट्रकने चिरडल्‍यामुळे दोन गटात चांगलाच वाद झाला. अपघातानंतर प्रकरण आपसात घेण्‍यासाठी समोरासमोर आलेल्‍या दोन गटांमध्‍ये जोरदार वाद झाला. दरम्‍यान फायरिंग झाली आणि दुस-या एका मजूराचा यामध्‍ये मृत्‍यू झाला.पोलिसांनी ट्रांसपोर्ट मालकाला ताब्‍यात घेतले आहे. ट्रकच्‍या खाली कसा आला मजूर..
- विश्वनाथ शाह असे ट्रक अपघातात चिरडल्‍या गेलेल्‍या मजूराचे नाव आहे.
- तर, फायरिंगमध्‍ये बळी गेलेल्‍या दुस-या मजूराची ओळख पटू शकली नाही.
- मिळालेल्‍या माहितीनुसार, विश्वनाथ त्‍याच्‍या बाइकवरून घरी जात होता.
- वाटेत भाजीपाला घेण्‍यासाठी तो रस्‍ता ओलांडत होता. दरम्‍यान, हा अपघात झाला.
- ट्रकने विश्वनाथला सुमारे पाचशे मीटर फरफटत नेले. घटनास्‍थळावरच त्‍याचा मृत्‍यू झाला.
पीडित पक्षाने मागितले 35 लाख रुपये
- अपघातानंतर इतर मजूरांनी घटनास्‍थळावर गर्दी केली. त्‍यानंतर प्रकरण अधिकच वाढत गेले.
- घटनास्‍थळी पोहोचलेल्‍या पोलिसांनी प्रकरण आपसात घेण्‍यासाठी दोन्‍ही पक्षांना आवाहन केले.
- मृत व्‍यक्‍तीचा भाऊ सुबोध शाह आणि दुस-या गटातील लोकांमध्‍ये चर्चा सुरू होती.
- पीडित पक्षाने दुस-या पक्षाकडे 35 लाख रुपयांची मागणी केली.
- पीडिताच्‍या कुटूंबाला पाच लाख रूपये देऊ असे दुस-या पक्षाचे म्‍हणने होते.
- मात्र, प्रकरण न मिळण्‍याने दोन्‍ही पक्षांमध्ये दगडफेक सुरु झाली. त्‍यानंतर फायरिंग.
- दरम्‍यान एका मजूराला गोळी लागली नि त्‍यात त्‍याचा घटनास्‍थळावरच मृत्‍यू झाला.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, अशी झाली फायरिंग, असा वाढला तणाव..
बातम्या आणखी आहेत...