आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुपवाड्यात दहशतवाद्यांचा अंदाधुंद गोळीबार, एक जवान जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- कुपवाडा जिल्ह्यातील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी शुक्रवारी रात्री अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये एक जवान जखमी झाला. लष्कराच्या इमारतीवर हा गोळीबार सुरू होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. यामध्ये सुनील रंधवा जखमी झाला असून  तो १७ जम्मू आणि काश्मीर लाइट इन्फंट्रीचा तो जवान होता. त्याला दुर्गमुल्लाच्या लष्करी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती आता ठीक असल्याचे सांगितले. लष्कराने या परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे.
बातम्या आणखी आहेत...