आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लुधियाना: RSS कार्यालयावर गोळीबार, शाखा सुरु होण्याआधी हल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घटनास्थळी दाखल झालेले पोलिस - Divya Marathi
घटनास्थळी दाखल झालेले पोलिस
लुधियाना - किडवई नगरमधील राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कार्यालयावर गोळीबार करण्यात आला आहे. हल्ला सोमवारी सकाळी 6.30 वाजता झाला. बाइकवर आलेले हल्लेखोर फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे.

शाखा सुरु असताना हल्ला
हल्ल्यात जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, या परिसराला सील करण्यात आले असून तपास सुरु आहे. हल्ला शाखा सुरु होण्याच्या वेळी करण्यात आला. हल्लेखोर विना क्रमांकाच्या बाइकवर आले होते.

पोलिस काय म्हणतात
लुधियानाचे पोलिस आयुक्त परमराज सिंग म्हणाले, घटनास्थळी 32 बोरच्या पिस्तूलाचे रिकामे काडतूस सापडले. या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही. पोलिस सर्व कारणांचा शोध घेत आहे.