आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्राच्या ऐक्यासाठीच अयोध्येत कारसेवकांवर गोळीबाराचे आदेश: मुलायम यांनी केले समर्थन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- समाजवादी पार्टीचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी बुधवारी आपल्या वयाची ७८ वर्षे पूर्ण केली. वाढदिवसाच्या प्रसंगी त्यांनी १९९० मध्ये अयोध्या कारसेवकांवर केलेल्या पोलिस कारवाईचे समर्थन केले. पोलिसांना गोळीबार करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. हा निर्णय योग्य होता. देशाच्या ऐक्यासाठी आणखी काही कारसेवकांना ठार करावे लागले असते तर तेही केले असते असे ते म्हणाले. 


१९९० मध्ये मुख्यमंत्री पदी असताना आम्ही देशाच्या ऐक्यासाठी कार सेवकांवर थेट कारवाई केली असे मुलायम म्हणाले. यात २८ लोकांचा बळी गेला होता. आणखी काही बळी गेले असते तरीही गैर नव्हते असे मत त्यांनी मांडले. आज मी गोपनीय बाब सांगत आहे. आम्ही मशीद वाचवली नसती तर त्या वेळी अनेक मुस्लिम तरुणांनी शस्त्र उचलली होती. त्यांनी म्हटले होते की, आमचे पूजास्थळच राहणार नसेल तर हा देश आमचा कसा म्हणायचा ? हे प्रश्न आज सर्वांनी जाणून घ्यायला हवेत. आपल्या पार्टीला आजही मुस्लिम समुदायाचा पाठिंबा असल्याचा दावा मुलायमसिंह यांनी केला. पार्टी मुख्यालयात आयोजित कार्यक्रमामध्ये मुलायम यांनी दावा केला की, मुस्लीमांनी सपाची साथ सोडलेली नाही. या उलट विधानसभा निवडणूकीत सपा नेते त्यांची मते मिळवू शकले नाहीत. अनेकांनी मतदान केले नाही. ज्या मुस्लिमांनी मतदान केले त्यातील ९०% मते सपाला मिळाली आहेत.


त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना म्हटले की, बहुतांश मुस्लीमांचे समर्थन आजही सपाला आहे. मात्र सद्य स्थितीत तुम्ही कसा बदल घडवून आणणार? मतदान केंद्राकडे त्यांना कसे आणणार ? त्यांच्या समस्यांमध्ये त्यांची साथ द्या. या कार्यक्रमाला मुलायम यांचे पुत्र आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादवही मंचावर उपस्थित होते.


अखिलेश आधी मुलगा, नंतर नेता

समाजवादी पार्टीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी म्हटले आहे की, अखिलेश यादव हा माझा मुलगा आधी आहे आणि पक्षनेता नंतर. त्यामुळे माझे आशीर्वाद त्याच्या पाठीशी सदैव होते आणि राहतील. मुलायम यांच्या या उद््गारामुळे पक्षातील तणाव निवळल्याचे संकेत मिळत आहेत. समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांच्या ७९ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बऱ्याच महिन्यांनी पिता-पुत्र एकाच मंचावर दिसले. पार्टी कार्यकर्त्यांनी मुलायम यांचे अभीष्टचिंतन केले. कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणात मुलायम यांनी आपल्या मुलावरील विश्वासाची आणि प्रेमाची साक्षच जाहीरपणे दिली. अखिलेश यांनी मंचावर मुलायमसिंह यांना दंडवत घातले व शाल देऊन त्यांचा गौरव केला. देशभरात मी अखिलेशला मुलासमान वागवेल काय, याची चर्चा झाली. मात्र तो माझा मुलगा आधी आहे. तो राजकीय नेताही आहे, मात्र वादाचे मुद्दे चर्चेने सोडवले जातील, असे मुलायमसिंह यादव म्हणाले.


४०३ पैकी ४७ जागा मिळाव्यात हे लज्जास्पद
अखिलेश यादव यांनी सपामध्ये काही सदस्यांना नाहक पदे देऊन ठेवली आहेत. गावपातळीवरही जागा जिंकू न शकणाऱ्या सदस्यांना पक्षातील पदे का दिली, असा सवाल मुलायम यांनी केला. पक्षाच्या निवडणुकीतील यशासाठी काहीच न करणाऱ्यांना मोठी पदे दिली आहेत. पक्षांतर्गत पद वाटपाचा घोळ एखाददुसरा नाही. याची चिकार उदाहरणे आहेत, असे मुलायम म्हणाले. वानगीदाखल नावेही त्यांनी सांगितली.

बातम्या आणखी आहेत...