आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Islamic State Module Busted 5 Held In Mp Police News In Marathi

ISISने भारतात पसरवले पाय; पोलिसांनी उधळले \'मॉडेल\', पाच अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/भोपाळ- इराक आणि सीरियात सक्रीय असलेली दहशतवादी संघटना ISIS ने भारतातही पाय पसरवण्यास सुरवात केली आहे. परंतु, पोलिसांनी ISIS चे हे 'मॉडेल' उधळून लावले असून पोलिसांनी पाच दहशतवाद्यांच्या नांग्या आवळल्या आहेत.

मिळालेली माहिती अशी की, मध्य प्रदेशातील रतलाममधील मागील महिन्यात पोलिसांनी पाच जणांना अटक केले होते. इस्लामिक स्टेटच्या जिहादी सेलशी आरोपींचा संबंध असल्याची धक्कादायक माहिती चौकशीतून बाहेर आली आहे. पाचही जणांची देशात मोठा घातपात करण्याची योजना आखली होती.

दहशतवाद्यांची ऑनलाइन भर्ती...
रतलाममधून अटक करण्‍यात आलेल्या पाचही आरोपींचे नेतृत्त्व इमरान खान मुहम्मद शरीफ हा करत होता. 'युसुफ' नामक एका व्यक्तीने 'इंडियन जिहादी'च्या माध्यमातून इमरानची ISIS मध्ये ऑनलाइन भर्ती करून घेतले होते.
कर्नाटकमधून जन्मा मुहम्मद शाफी अरमर हा ISISसाठी देशात तरुणांची ऑनलाइन भर्ती करत असल्याची माहिती मिळाली आहे. शाफी हा यापूर्वी 'इंडयिन मुजाहिद्दीन'साठी काम करत होता. शाफीचा भाऊ मुहम्मद सुल्तान अरमर गेल्या मार्च महिन्यात सीरियात मारला गेला होता. इमरान खानसह वसीम खान, मोहम्मद रिजवान, अनवर आणि मजहर सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे.

इमरान आणि यूसुफ हे दोघे 'प्रो-इस्लामिक'या फेसबूक पेजच्या माध्यमातून पहिल्यांदा संपर्कात आले होते. युसूफने इमरानला भारतात ISISसाठी काम करण्‍याची ऑफर दिली होती. इमराननेही ही ऑफर स्विकारली होती.

स्फोटके बनवण्याचे केमिकल्स ठेवताना पोलिसांनी आवळल्या नांग्या...
स्पोटके बनवण्यासाठी लागणारे केमिकल्स ठेवताना पोलिसांनी पाचही आरोपींच्या नांग्या आवळल्या. पाचही जणांना रतलाम येथून अटक केले. याशिवाय चौकशी अधिकार्‍यांनी एक ऑडिओ टेप सापडली आहे. त्यात अरमर हा इमरान खानकडून स्फोटक तयार करण्‍याची माहिती घेत आहे. हल्ल्यासाठी शस्त्रास्त्रे कशी खरेदी करणे, हल्ल्याचे प्लानिंग याविषयी सगळी माहिती तो इंटरनेट आणि चॅटवरून घेत होता. दोघांच्या संभाषण जप्त केल्याचे पोलिसांनी
सांगितले आहे.