आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोलकत्यात आईच्या दुधाची सार्वजनिक बँक, सोलापूरमध्ये कधी ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - येथील एसएसकेएम रुग्णालयात आईच्या दुधाची पहिली बँक सुरू करण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हस्ते करण्यात आले. ज्या मुलांची आई काही कारणास्तव त्यांना दुध पाजू शकत नाही त्या मुलांना या बँकेतुन दुध दिले जाईल. बँकेतुन नि:शुल्क दूध देण्यात येणार असल्याचे रुग्णालयाचे अधीक्षक तमल कांती घोष यांनी सांगितले आहे.

सोलापूरमध्ये मदर मिल्क बँकची गरज
मातेच्या दुधापासून वंचित असलेल्या अनेक बाळांना दूध देण्यासाठी पुणे, मुंबईसह राज्यातील विविध शहरांमध्ये मदर मिल्क बँक कार्यरत आहेत. आज सोलापुरात 30 टक्के बालके ही आपल्या आईच्या दुधापासून वंचित आहेत. सोलापुरात मदर मिल्क बँक तयार झाली तर वंचित असलेल्या त्या 30 टक्के बाळांना मातेचे दूध मिळू शकणार आहे.