आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एव्हरेस्टच्या 17,600 फूट उंचीच्या शिखरावर पहिली संगीत पार्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काठमांडू- एव्हरेस्टच्या १७,६०० फूट उंच बेसवर नाष्ट्यानंतर संगीत पार्टीची सुरुवात झाली आहे. ब्रिटिश डीजे पॉल ऑकेनफोल्ड यांनी मंगळवारी येथे संगीत पार्टी केली. जगात एवढ्या उंचीवर अशी पार्टी होण्याची ही पहिलीच वेळ होती. 

१०० पर्वतारोहक आणि ट्रॅकर ५३ वर्षीय पॉल यांच्या संगीत रचनांचे साक्षीदार ठरले. अमेरिकी पर्वतारोहक बेन जोन्स म्हणाले, ‘मी येथे अनेक वर्षांपासून येत आहे, पण पहिल्यांदाच अशी पार्टी अनुभवली. अद्भुत.’ नेपाळ सरकारने काही दिवसांपूर्वीच एव्हरेस्टच्या बेसवर ब्रेकफास्ट पार्टीची परवानगी दिली. प्रवास कंपन्या त्यासाठी सुमारे तीन लाख रुपये घेत आहेत. पर्यटक येथे कमाल १५ मिनिटांपर्यंतच थांबू शकतात.

१० दिवस ट्रेकिंग केल्यावर पोहोचले बेसवर, नंतर केले रचनांचे मिश्रण  
डीजे पॉलने सांगितले की, मी पहिल्यांदाच ट्रेकिंग केले आहे. मला बेसवर पोहोचण्यास १०  दिवस लागले. येथे गोठवणारी थंड हवा आहे. त्यामुळे रचनांच्या मिश्रणासाठीही खूप मेहनत करावी लागली.
बातम्या आणखी आहेत...