पानिपत - 14 जानेवारी 1761 रोजी तिसरे पानिपत युद्ध झाले. त्या आता 255 वर्षे पूर्ण होतील. अवघ्या तीन तासांत रोहिल्यांनी मराठ्यांवर मात केली होती. यात हजारो सैनिक मारले गेले. त्यापेक्षा दुप्पट मुलं अनाथ झाली. अनेक महिला विधवा झाल्या. वृद्ध माता-पित्यांची आयुष्याच्या उतावयातील आपली काठी गमावली. मात्र, यापूर्वीही या ठिकाणी तीन युद्ध झाली होती. त्या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे पहिल्या आणि दुसऱ्या पानिपत युद्धाची खास माहिती...
पानिपतमुळेच मुघलांना दिल्ली मिळवली....
इतिहासामध्ये आतापर्यंत तीन पानिपत युद्धे झाली. पहिले युद्ध 21 एप्रिल 1526 दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यात लढले गेले. बाबरच्या छोट्या परंतु शिस्तबद्ध सेना आणि तोफा यांच्या बळावर लोधीच्या एक लाखापेक्षा मोठ्या फौजेचा लीलया पराभव केला आणि भारतात मुघल सत्तेचा पाया घातला. हे युद्ध केवळ तीन तास चालले होते. बाबरला जहीर-उद्दीन खान या नावाने ओळखले जाते. लोधी साम्राज्याची सेना खूप मोठी होती. त्यांच्याकडे लाखो सैनिक होती. त्या तुलनेत बाबरांकडे 10 टक्केही सैना नव्हती. परंतु, मुगघ सेना अत्यंत नियोजनबद्ध लढली. त्यांनी इब्राहम लोधीला मात दिली.
पुढील स्लाइडवर वाचा, नेमके किती होते सैन्य...