आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे राजस्थानातील सर्वात मोठा भूयारी मार्ग, 5 मिनीटात कापले जाईल अर्ध्या तासाचे अंतर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोटा (राजस्थान) - राज्यातील सर्वात मोठा आणि सहा पदरी भूयारी मार्ग पुढील आठवड्यात जनतेसाठी खुला होण्याची शक्यता आहे. कोटा-देवळी चौपदरीकरणांतर्गत बूंदी येथे हा भूयारी मार्ग तयार केला गेला आहे. कोटा ते देवली हा मार्ग जुलै मध्ये सुरु होणार आहे. राज्यातील पहिलाच सहापदरी भूयारी मार्ग तयार करणे हे अभियंत्यांसह कामगारांसाठी मोठे आव्हानात्मक होते.

डिसेंबर 2012 मध्ये भूयारी मार्गाचे काम सुरु झाले. रॉक ड्रील मशिन्सनी पाहाड चिरण्यास सुरुवात केली. भूयारी मार्ग तयार करणाऱ्या कुशल मजूरांना यासाठी आणण्यात आले. येथे कामाबरोबरच सुरक्षाही तेवढीच महत्त्वाची होती. छोटी चूक देखील जीवघेणी ठरण्याची शक्यता होती. त्यामुळे एक-एक पाऊल विचारपूर्वक ठेवले जात होते. डोंगराचा 70-80 मीटर भाग असा होता, जिथे दगड ठिसूळ होता. या भागावर पावसाळी नाला होता. त्यामुळे डोंगर आतून ठिसूळ झालेला होता.
युद्ध डोंगराबरोबर उकाड्यासोबतही
येथे काम करत असलेल्या एका मजूराने सांगितले, की डोंगर कापण्याच्या संघर्षाबरोबरच आम्हाला उकाड्याचाही खूप त्रास झाला. आतापर्यंत उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीर सारख्या भागात आम्ही काम केलेले होते. हे थंड हवामानाचे प्रदेश. येथे मात्र गर्मीने हैरान केले. डोंगराळभागातील भूयारांपेक्षा येथे अनेक समस्या निर्माण झाल्या. दोन - चार मीटरवर दगडाचा प्रकार बदलत होता. त्यामुळे काम कसे करायचे याचा अंदाज बांधता येत नव्हता. डोंगराळ भागात साधारण एकाच प्रकारचा दगड असतो.
बातम्या आणखी आहेत...