आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बंगालमध्ये प्राचार्यपदी तृतीयपंथी, उपेक्षितांना न्याय देण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - पश्चिम बंगाल सरकारने एका तृतीयपंथीयाची महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी नियुक्ती केली आहे. सरकारचा हा निर्णय तृतीयपंथीयांना सशक्त करण्याच्या दृष्टीने उचललेले पाऊल म्हणून पाहिले जात आहे. देशातील अशा प्रकारचे हे पहिलेच प्रकरण आहे.

मानबी बंदोपाध्याय नावाच्या तृतीयपंथीयाला कृष्णानगरमधील महिला महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी नियुक्त करण्यात आले आहे. तो ९ जून रोजी पदभार स्वीकारेल. विवेकानंद सतोवार्षिकी महाविद्यालयात तो सहप्राध्यापक आहे. कल्याणी विद्यापीठाचे कुलपती रतनलाल हंगलू म्हणाले, तो एक सक्षम प्रशासक आणि चांगला माणूस आहे. या निर्णयामुळे संपूर्ण देशातील हा वर्ग सशक्त होईल. पश्चिम बंगाल सरकारने हे पाऊल उचलल्याबद्दल आपणास आनंद होत आहे. मानबीला ज्या महाविद्यालयात प्राचार्यपदी नियुक्त करण्यात आले आहे, ते कल्याणी विद्यापीठाशी संबंधित आहे.

या वर्षी प्रेसिडेन्सी विद्यापीठ आणि जादवपूर विद्यापीठाने प्रवेश अर्जाच्या माहितीत तिसऱ्या लिंगाचा समावेश केला आहे. गेल्या महिन्यात राष्ट्रीय स्तरावर ट्रान्सजेंडर व्यक्तींचे हक्क विधेयक, २०१४ राज्यसभेत मंजूर करण्यात आले होते. ४५ वर्षांनंतर पहिल्यांदाच राज्यसभेत एक खासगी विधेयक सर्वसंमतीने मंजूर झाले होते.
या विधेयकात तृतीयपंथी समुदायासाठी एक राष्ट्रीय आयोग आणि राज्यस्तरीय आयोग स्थापण्याची योजना आहे.
बातम्या आणखी आहेत...