आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्यादा राम रहीमला भेटण्यास जेलमध्ये पोहचली पत्नी, पाहिल्यावर रडु लागला बाबा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राम रहीमला भेटण्यास आलेला मुलगा जसमीत, जावई रूह-ए-मीत आणि राम रहीमची पत्नी हरजीत कौर. - Divya Marathi
राम रहीमला भेटण्यास आलेला मुलगा जसमीत, जावई रूह-ए-मीत आणि राम रहीमची पत्नी हरजीत कौर.
रोहतक- हरियाणातील रोहतक येथील सुनारियां जेलमध्ये 20 वर्षांची शिक्षा भोगणाऱ्या गुरमीत राम रहीमला भेटण्यास पहिल्यादा त्याची पत्नी हरजीत कौर आली होती. पत्नीला पाहिल्यावर गुरमीत राम रहीम रडु लागला. या दरम्यान राम रहीमचा मुलगा जसमीत, त्याची पत्नी हुस्नजीत, मुलगी चरणप्रीत, जावई रुह-एच-मीत सोबत होते. ही भेट सुमारे 20 मिनिटे चालली. 
 
दिवाळीची मिठाई आणि कपडे घेऊन पोहचले घरचे
- सोमवारी दुपारी सव्वातीन वाजता चार गाडयांमध्ये राम रहीमचे घरचे आले होते. त्यांची चौकशी करुन मग त्यांना सोडण्यात आले. ते गुरमीतला कपडे, कॅन्टीनच्या खर्चासाठी पैसे आणि दिवाळीची मिठाई घेऊन आले होते. गुरुवारी पुन्हा ते त्याला भेटण्यास येणार आहेत. त्यावेळी त्याची आई नसीब कौर सुध्दा येऊ शकते. 
 
सगळ्यात पहिल्यादा पत्नीला मिळाला गुरमीत
- जेलमध्ये एका जाळीच्या पलिकडे गुरमीत होता, तर अलिकडे त्याच्या घरचे होते. सगळ्यात पहिल्यादा त्याची पत्नी त्याला भेटली. तिला पाहताच गुरमीत भावुक झाला. त्यानंतर त्याने घरातील प्रत्येकाची भेट घेतली. चर्चे दरम्यान त्याने डेऱ्याबाबतही विचारले. 
 
9 ऑक्टोबरला भेटले होते कुटुंबीय
- 9 ऑक्टोबर रोजी राम रहीमच्या कुटुंबियापैकी राम रहीमचा मुलगा, लहान मुलगी आणि जावई, आई नसीब कौर त्याला भेटण्यास आले होते. 
- ही मुलाखत 80 मिनिटे चालली होती. 
 
खाण्याच्या वस्तू घेऊन येतात घरचे
- राम रहीमच्या घरचे दरवेळी त्याच्यासाठी खाण्याच्या वस्तू घेऊन येतात. 
- यात फळे, ड्राय फ्रुट, कपडे याचा समावेश असतो.
 
10 लोकांना भेटण्याची व्यक्त केली होती इच्छा
- गुरमीत राम रहीमने जेल प्रशासनाकडे आई नसीब कौर, मुलगा जसमीत सिंह, मुलगी चरणप्रीत, अमरप्रीत आणि हनीप्रीत, सुन हुस्नप्रीत, जावई शान-ए-मीत, डेऱ्याची व्यवस्थापिका विपासना आणि दान सिंह यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती.
- आतापर्यंत विपासना, हनीप्रीत आणि दान सिंह यांना सोडून तो या सगळ्यांना भेटला आहे. 
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...