आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उदयपूरच्या गावात 70 वर्षांत पहिल्यांदा 4 मुलांचे पाचवीच्या पुढे शिक्षण, दररोज 4 किमी पायपीट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उदयपूर - उमा, हुकमी, मदन व रोशन दररोज ४ किमी दगड-धोंड्यांचा रस्ता पायी तुडवत शाळा गाठत आहेत. उमा, मदन ११ वीत आणि हुकमी, रोशन ९ वीत शिकत आहेत. उदयपूरमधील ३०० लोकसंख्येच्या बागदडा गावात ७० वर्षांत पहिल्यांदा पाचवीच्या पुढे असे कोणीतरी शिकत आहे. मुलांचे पिता गणेशलाल गमेती यांची जिद्द आणि संघर्षामुळे हे शक्य झाले आहे.
 
उदयपूर मुख्यालयापासून ७० किमी अंतरावर बागदडा गाव आहे. या गावात अद्याप वीज, रस्ता, टीव्ही व मोबाइल नाही. पिण्याच्या पाण्यासाठी एक विहीर आहे. गावातील बहुतांश नागरिक निरक्षर आहेत. काही वर्षांपूर्वी गावात पाचवीपर्यंत शाळा सुरू  झाली. पावसाळ्यात ओढ्याच्या पाण्यामुळे मुले शाळेत जाऊ शकत नव्हती.अशा स्थितीतही गणेशलाल आपल्या दोन्ही मुली व मुलांना  रोज शाळेत सोडतात. शाळेच्या संघर्षमय प्रवासाबद्दल गणेशलाल म्हणाले, मुलींना पाठवताना भीती वाटतेच. मात्र, शिक्षणाने या गावचा अंधार मिटू शकतो हे माहीत असल्याने जोखीम घेत आहे. मुले शाळेतून घरी येत नाहीत तोपर्यंत मनाचा थरकाप उडतो.

उमा, हुकमी म्हणाली - जिल्हाधिकारी होऊन रस्ता बांधणार
गावात पहिल्यांदा शिकणाऱ्या मुली उमा आणि हुकमी यांचे स्वप्न जिल्हाधिकारी होण्याचे आहे. त्या म्हणाल्या, गावातील मुलांना पुढील शिक्षण घेता यावे यासाठी सर्वात पहिल्यांदा रस्ता करेन. डोंगराकडे दिशानिर्देश करत त्या म्हणाल्या, आम्हाला रोज डोंगर चढावा लागतो. शाळेत जायला दोन तास लागतात. पावसात आम्ही शाळेत जाऊ शकत नाही.
 
बातम्या आणखी आहेत...