आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Time Mangal Yaan Orbit Way Change By Isro Scientists

पहिल्यांदा मंगळयानाच्या कक्षेत यशस्वीरित्या बदल, इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे यश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - इस्रोच्या शास्त्रज्ञांनी बुधवारी पहिल्यांदा मंगळयानाच्या कक्षेत यशस्वीरीत्या बदल(टीसीएम) केला. मंगळाच्या दिशेने निघालेले यान सध्या पृथ्वीपासून जवळपास 29 लाख कि.मी. अंतरावर आहे. मंगळयान योग्य कक्षेत ठेवण्यासाठी एकूण चार टीसीएम केले जाणार आहेत.
इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, मंगळयान योग्य कक्षेत ठेवण्यासाठी सकाळी 6.30 वाजता प्रयत्न सुरू करण्यात आले. त्यावर 40.5 सेकंदापर्यंत 22 न्यूटन बल लावण्यात आला. इस्रोने आपल्या फेसबुक पेजवर म्हटले की, टीसीएमसाठी सुरुवातीस यानास फिरवून योग्य स्थितीत आणले. अंतराळयानात लावलेल्या संगणक बोर्डाच्या माध्यमातून मार्गात भटकण्याच्या स्थितीत सुधारणा करण्यात आली. नियंत्रण कक्षातून मंगळयानापर्यंत संदेश पोहोचण्यास व तेथून तो परत येण्यास साधारण 20 सेकंद वेळ लागतो.