आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानी रेंजर्समध्ये प्रथमच शीख जवान, अमरजितसिंग यांनी स्वीकारली मानवंदना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाघा बॉर्डर- वाघाबॉर्डरवर रिट्रीट सेरेमनीमध्ये पाक रेंजर्समध्ये बहुतांश वेळा मुस्लिम सैनिकच अभिवादन स्वीकारत असतो; परंतु गुरुवारी पार पडलेल्या समारंभात पाकिस्तानकडून शीख रेंजर्स अमरजित सिंह याने परेडची मानवंदना स्वीकारली. पाकिस्तानी रेंजर्सकडून एखादा शीख सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने भारतीय सैनिकांसह सर्वचजण अमरजितसिंहकडे कुतूहलाने बराच काळ पाहत होते.
अमरजित गुरुनगरी ननकाना साहिबचा राहणारा आहे. याच वर्षी त्याने प्रशिक्षण पूर्ण केले असून तो पाक रेंजर्समध्ये भरती झाला आहे. अमरजितने भारतीय सैनिकांशी हस्तांदोलन केले तेव्हा शिट्या टाळ्यांनी परिसर दणाणून गेला.