आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्‍य प्रदेशात होणार पहिला ट्रान्सजेंडर विवाह, मुलगी दत्तक घेण्याचाही केला निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - भोपाळमध्ये राहणारी संजना (30) आणि शादाब हुसेन (29) या दोघांनी त्यांच्यात नऊ वर्षांपासून असणा-या नात्याला लग्नाच्या बंधनात बदलण्याचा निर्णय घेतला आहे. हा मध्य प्रदेशातील अशा प्रकारचा पहिलाच विवाह आहे. शादाबच्या तीन वर्षांच्या पुतणीला दत्तक घेऊन ते विधिवत तिचे आई व़डिलही बनणार आहेत. संजना ट्रान्सजेंडर आहे. त्यामुळे या दोघांच्या नात्याला अनेकांनी नाकारले होते. पण आता दोघांचेही कुटुंबीय या नात्यासाठी तयार आहेत.

दुस-याशी ठरवला होता विवाह
एका मुलाखतीत संजनाने सांगितले की, काही दिवसांपूर्वी शादाबचा एका मुलीबरोबर साखरपुडा झाला होता. 7 जूनला दोघांचा विवाहही होणार होता. पण जेव्हा शादाबच्या कुटुंबीयांना त्याच्या आवडीबाबत समजले तेव्हा त्यांनी तो विवाह रद्द करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबीयांची तयारी असली तरी दोघांच्या शेजा-यांना मात्र हे नाते मान्य नव्हते.

शादाबचे कुटुंबीय समजदार
संजनाने सांगितले की, ' आमच्याबाबत समजल्यानंतर एक दिवस शादाबच्या कुटुंबीयांनी मला त्यांच्या घरी बोलावले. मी खूप घाबरली होते. पण मला माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास होता. त्यामुळे मी त्यांना भेटण्यासाठी गेले. तेथे कुटुंबीयांना आमचे म्हणणे सांगितले. त्यांचे कुटुंब फारच समजदार आहे. त्यांनी आमचे म्हणणे शांतपणे ऐकले आणि आमच्या प्रेमाचा स्वीकारही केला. त्यानंतर दोन्ही कुटुंबांचे सदस्य एकमेकांना भेटले व लग्नाबाबत बोलणी केली.
9 वर्षांचे नाते
शादाबने सांगितले की, ते दोघे नऊ वर्षांपासून सोबत आहेत. शादाब एक ट्रान्सपोर्ट कंपनी चालवतो. तर संजना ट्रान्सजेंडरर्ससाठीच्या एका संस्थेत समुपदेशनाचे काम करते.
फोटो - शादाब आणि संजना