आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाची झाली मुलगी, शाळकरी वयातील प्रेमासाठी केले ऑपरेशन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्री घटकने लिंग बदल सर्जरी करुन मित्र संजयसोबत लग्न केले. - Divya Marathi
श्री घटकने लिंग बदल सर्जरी करुन मित्र संजयसोबत लग्न केले.
कोलकाता - शाळेत असताना दोन मित्रांमधील मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. मात्र दोघेही एकाच सेक्सचे असल्याने त्यांना एकरुप होता येत नव्हते. त्यामुळे त्यापैकी एका मुलाने स्वतःवर सर्जरी करुन घेतली आणि मुलगी झाला. त्यानंतर त्यांनी लग्न केले. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील या विवाहाची सध्या देशभर चर्चा सुरु आहे. प्रथमच एका ट्रान्सजेंडर कायदेशीर लग्न केले आहे. 
 
शाळेत असताना जडला एकमेकांवर जीव 
- कोलकाता येथील श्री घटक आणि संजय मुहूरी यांनी लग्न केले आहे. 
- दोघे शाळकरी वयापासून एकमेकांचे मित्र होते आणि त्यांच्या प्रेमभावना फुलत गेली. 
- दोन मित्रांच्या या प्रेमाचे रुपांतर आता लग्नात झाले आहे. 
- त्यासाठी श्री घटकने 2015 मध्ये सेक्सचेंज सर्जरी करुन मुलाचा मुलगी झाला.  
 
8वीत असताना झाले प्रेम 
- श्री घटकने सांगितल्यानुसार, तो 8वीत असताना संजयकडे आकर्षित झाला होता.
- एखादा मुलगा आणि मुलगी यांच्यात जसे प्रेम असते तशाच भावना या दोघांच्या होत्या. संजय मात्र श्री घटकबद्दल कधी-कधी कन्फ्यूज असायचा.
- सामाजिक विरोध हा होताच. या दोघांच्या कुटुंबियांनाही हे संबंध मान्य नव्हते.
 
ट्रान्सजेंडर कम्यूनिटीसाठी मोठा दिलासा 
- संजय मुहूरी आणि श्री घटक यांनी ट्रान्सजेंडर कम्यूनिटीसमोर मोठे उदाहरण घालून दिले आहे. 
- संजय मल्टीनॅशनल कंपनीत मार्केटिंग कन्सल्टंट आहे. एक वर्षापूर्वी त्याने श्री घटकसोबत लग्न केले.
- यांच्या लग्नाला कायदेशीर मान्यता मात्र शुक्रवारी मिळाली. त्यांनी 17 फेब्रुवारी रोजी लग्नाची नोंदणी केली. 
- एक वर्ष सामाजिक उपेक्षा सहन केलेल्या श्री घटकने विवाह नोंदणीनंतर म्हटले की , इतर ट्रान्सजेंडरनेही कायदेशीर विवाह नोंदणी करुन नव्या आयुष्याला सुरुवात केली पाहिजे.
 
आईने दिली साथ 
- लिंगबदल करुन मुलगी झालेल्या श्री घटकने सांगितले, की बालपणापासून तारुण्यापर्यंत मला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. 
- त्याने सांगितले, की अनेकदा लोकांनी मजाक उडवली. मारहाण देखील केली. 
- अशावेळी कुटुंबाची साथ फार महत्त्वाची होती, त्या काळात मला समजून घेणारी फक्त माझी आईच होती. सुरुवातीपासून आतापर्यंत फक्त आईच माझ्यासोबत खंबीरपणे उभी राहिली. 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, संजय आणि श्री घटक यांच्या लग्नाचे निवडक फोटो 
      
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...