आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Fish Plates Were Opened Before Rajdhani Express Accident

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'राजधानी एक्स्प्रेस\' येण्याआधीच अज्ञातांनी उघडल्या होत्या रुळाच्या 25 फिश प्लेट्‍स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- छपरा आणि गोल्डनगंज रेल्वे स्टेशनदरम्यान राजधानी एक्स्प्रेसची ज्या रुळावर दूर्घटना घडली, त्या रुळावरील 25 फिश प्लेट उघड्या असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. या प्लेट आपोआप उघडत नाहीत. गुप्तचर संस्थांनी नक्षली हल्ल्याची शक्यता आधीपासूनच वर्तविली होती. राज्य सरकारला यासंदर्भात माहिती देण्यात आली होती. डीआरएम राजेश तिवारी यांनीही या वृत्ताला दुजोरा द‍िला आहे. रेल्वे रुळाचे फिश प्लेट्‍स कोणी व कशा उघडल्या यादिशेने तपास सुरु असल्याचे तिवारींनी सां‍गितले.

दरम्यान, राजधानी एक्स्प्रेसचे इंजिनसह 11 डबे रुळावरून घसरल्यामुळे पाच प्रवासी ठार तर 63 जखमी झाले. जखमींमध्ये काही जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे.
मंगळवारी रात्री राजधानी एक्स्प्रेस दिल्लीहून आसामच्या दिब्रुगडकडे जात होती. यादरम्यान रात्री सव्वादोन वाजता रेल्वे इंजिनसह 11 डबे रुळावरून घसरले. अपघात एवढा भीषण होता की काही डबे बाजूच्या शेतात जाऊन पडले. अपघातामुळे 25 रेल्वे रद्द करण्यात आल्या तर काहींचे मार्ग बदलण्यात आले. रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यांनी नक्षली घातपाताच्या शक्यतेचा इन्कार केला नाही. मात्र, गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी इतक्यात निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. बिहारचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनीही नक्षली हल्ल्याची शक्यता नाकारली.

नक्षलींचे होऊ शकते कारस्थान...
राजधानी एक्स्प्रेसची दूर्घटना नसून नक्षलींनी घडवून आणलेला घातपास असू शकतो, असा संशय वर्तवला जात आहे. नक्षलींनी 25 जून रोजी सारण आणि तिरहुत प्रमंडलमध्ये बंद पुकारला होता. दरियापूरमध्ये मोठ्याप्रमाणात नक्षलींचे पोस्टर आढळून आले आहेत. विशेष म्हणजे रेल्वे विभागाला याबाबत माहिती मिळाली होती. तरी देखील रेल्वे प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही. दूर्घटनेची माहिती मिळताच केंद्रीय रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी घटनास्थळी पोहोचले. राजधानीचा अपघात नसून घातपात असल्याचा संशयही गौडा यांनी व्यक्त केला आहे.

गौडा म्हणाले, या दूर्घटनेमागे स्थानिक नक्षलींचा हात असू शकतो. यात रेल्वे अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या दूर्घटनेत नक्षलींचा हात असून त्या दिशेने तपास सुरु असल्याचे पूर्व-मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अरविंद रजक यांनी सांगितले.

नक्षली एरिया कमांडरचा स्पष्ट नकार...
माओवादी संघटनेचा एरिया झोनल कमांडर प्रहार याने दूरध्वनीवरून सांगितले की, राजधानी एक्स्प्रेसच्या दूर्घटनेत माओवादींचा हात नाही. रेल्वे व जिल्हा प्रशासनाच्या असुरक्षितेचे ही दूर्घटना एक उत्तम उदाहरण असल्याचे प्रहार म्हणाला. बंदच्या काळात फक्क चकिया व परसा मधील टॉवर जाळण्यात आले आहे. या घटनेत माओवादींचा हात नाही.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, तीन दिवसांत तपास- रेल्वेमंत्री
(फोटो- दुर्घटनाग्रस्त झालेल्या राजधानी एक्स्प्रेसची बोगी)