आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहार : गुंडांनी बंदुकीच्या धाकावर बंदी बनवून 5 दलित महिलांवर केला गैंगरेप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(प्रतिकात्मक फोटो)
आरा - भोजपूरच्या कुरमुरी गांवात पाच दलित महिलांवर गँगरेप झाला. या सर्व महिला भंगार विकण्याचे काम करणा-या आहेत. त्या शेजारच्या गावातल्या असून कुरमुरीमध्ये भंगार विकण्यासाठी गेल्या होत्या. तेथेच गुंडांनी बंदुकीच्या धाकावर या महिलांना बंदी बनवले. ही घटना बुधवारी सायंकाळी घडलेली आहे. पण या प्रकरणाचा खुलासा गुरुवारी झाला. सिकरहटा पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी रात्री उशीरा एका आरोपीला अटक केली आहे.
फोन करून मित्रांना बोलावले
भोजपूरचे एसपी राजेश कुमार यांनी सांगितले की, या पाचही महिला अत्यंत गरीब आहेत. त्या भंगार गोळा करून त्यावर उदरनिर्वाह चालवतात. बुधवारी भंगार विकायला गेल्या तेव्हा दुकानदाराने त्यांना सामान खरेदी करण्याचा बहाणा करत थांबवून ठेवले. त्यानंतर आपल्या सहका-यांन फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर मित्रांना बोलावून बंदुकीचा धाक दाखवत गँगरेप केला.
आरोपींचा शोध सुरू
एका आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिसांनी इतरांना अटक करण्यासाठी छापे टाकण्यास सुरुवात केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. फौजदार आणि एसपींना त्वरित या प्रकरणाचा तापस करून दिरंगाईबाबतचा अहवाल पाठवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.


पुढे वाचा, गावक-यांनी येऊन सर्वांना सोडवले...