आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रायपूर: लॉजमध्ये लागलेल्या आगीत 5 व्यापाऱ्यांचा मृत्यू; मृतांत महाराष्ट्रातील दोघे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर- येथील तुलसी लॉजमध्ये सोमवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास लागलेल्या भयंकर आगीत  श्वास कोंडल्याने चौघांचा आणि जळाल्याने एकाचा मृत्यू झाला. एका मृताची अद्याप ओळख पटलेली नाही.  

शहरातील सर्वात अरुंद गल्लीत आणि ठोक बाजारात असलेल्या या हॉटेलला लागलेली आग इतकी मोठी होती की पाहता पाहता चार मजले आगीने वेढले गेले. तळमजल्यावरील २२ पैकी १८ दुकाने  आणि पहिल्या मजल्यावरील ८ गोदामे जळून खाक झाली. 

दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील हॉटेलच्या खोल्यांमध्ये आग पसरली. या आगीत दोन कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाले. हॉटेलमध्ये थांबवलेल्या ज्या व्यापाऱ्यांचा मृत्यू झाला त्यापैकी तिघे राजस्थानचे असून दोन महाराष्ट्रातील आहेत. मृतापैकी चौघांची ओळख पटली आहे, तर एका व्यक्तीचा केवळ सापळाच राहिल्याने त्यांची ओळख पटू शकली नाही. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार लॉजजवळील एका इलेक्ट्रिकल पोलवर शॉर्टसर्किटमुळे आग भडकली. हा भाग खूप दाट लोकवस्तीचा आहे. येथे ११ व्यक्ती थांबलेल्या होत्या. खोल्यामधून धूर निघताना एकच धावपळ उडाली. 
 
मृतांची नावे 
१ . पोपटलाल, राजस्थान  
२.  दलपत, राजस्थान, 
३. तुलाराम, राजस्थान
४ . प्रवीण पुरोहित, मुंबई  
 
या घटनेचा एक व्हिडिओ सापडला असून काही लोकांनी ही आग मोबाइलमध्ये चित्रित केली होती. व्हिडिओमध्ये आग स्पष्ट दिसत असून प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रिक पोलवर ठिणग्या उडाल्या. आवाज ऐकून लोक घरातून बाहेर आले. तोपर्यंत आगीच्या लोळाने लॉजला वेढले. तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी लाॅजमध्ये झोपलेल्या लोकांना उठवण्याचा प्रयत्नही केला.
बातम्या आणखी आहेत...