आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका दुर्घटनेने एकाच कुटुंबातून निघाल्या 5 अंत्ययात्रा, क्षणात संपल्या तीन पिढ्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलीच्या लग्नात पवन गोयल यांच्या कुटुंबाचा एका फोटो. - Divya Marathi
मुलीच्या लग्नात पवन गोयल यांच्या कुटुंबाचा एका फोटो.
सादुलशहर (राजस्थान) - राजस्थानमधील गंगानगर जिल्ह्यातील एका कुटुंबातील पाच जणांचा अपघातात मृत्यू झाला. लग्नानंतर मुलीची पाठवणी करुन हे कुटुंब घरी परतत असताना हा अपघात झाला. यात तीन पिढ्यातील पाच जणांचा दुर्देवी अंत झाला. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.
काय आहे प्रकरण
- रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या एकाचकुटुंबातील पाच जणांपैकी दोघांवर अबोहर आणि तिघांवर सादुलशहर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
- यातील सादुलशहरातील सीमेंट व्यावसायिक पवनकुमार गोयल यांची विवाहित मुलगी रितू सिंगल आणि रितूची मुलगी नायरा यांचे पार्थिव त्यांच्या गावी अबोहर येथे अँब्यूलन्से नेण्यात आले.
- रितूची आई निर्मला गोयल, वहिणी गरिमा, भाचा गनीष यांच्यावर सादुलशहरातील श्रीराम कल्याण स्मशानभूमीत शनिवारी अंत्यसंस्कार झाले.
मृतदेह पाहून बेशुद्ध पडली नवविवाहिता
- लग्नांतर शनिवारी सकाळी व्यावसायिक पवन गोयल यांनी साश्रू नयनांनी मुलगी अनुची पाठवणी केली होती.
- अनुची पाठवणी करुन घरी परतत असताना ही दुर्घटना झाली.
- अपघाताची माहिती मिळाल्यानंतर अनुवर जणू दुःखाचा डोंगर कोसळला. सकाळी ज्यांनी आनंदात सर्व कार्य पार पाडले आता त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहावे लागत असल्याने तिच्या अश्रूंचा बांध फुटला.
- अनु तिची आई निर्मला, वहिणी गरिमा आणि लगानगा भाचा गनीष यांच्या मृतदेहाला बिलगून रडत होती. रडता-रडताच ती बेशुद्ध झाली.
दैवाने माझे खेळणे हिरावून घेतले
- व्यावसायिक पवन गोयल यांना मृत नातू गनीषकडे पाहून गहिवरुन येत होते.
- ते परत-परत म्हणत होते, की आता मी कोणासोबत खेळणार, दैवाने माझे खेळणेच हिरावून नेले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मायलेकी आणि गोयल यांची सून...
बातम्या आणखी आहेत...