आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तरुणींच्या मदतीने 'ब्लॅक मनी' व्हाइट करण्याच्या प्रयत्नात होती ही मंडळी; वाचा, असे समोर आले सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलवर- 500-1000 हजार रुपयांच्या नोटा रद्द झाल्याने सर्वच क्षेत्रांमधील आर्थिक व्यवहार थंडावले आहेत. सर्वसामान्यांना या निर्णयाची झळ बसत आहे. पण सर्वाधिक फटका घरात रोख रक्कम ठेवणार्‍यांना बसला आहे. पैसा सुरक्षित करण्यासाठी हे लोक इतरांची मदत घेताना दिसत आहे. राजस्थानमधील अलवर येथील असाच काहीसा प्रकार उजेडात आला आहे. पोलिसांनी पाच तरुणींसह 12 जणांना ताब्यात घेतले आहे.
तीन गाड्यांमधून घेऊन जात होते 1 कोटी 32 लाख...
- अलवर पोलिसांनी नाकाबंदी करून किशनगडबास आणि तिजारादरम्यान अलवर भिवाडी मेगा हायवेवर तीन गाड्यांमधून 1 कोटी 32 लाख 43 हजार रुपये जप्त केले.
- तसेच पाच तरुणींसह 12 जणांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांना संशय येऊ नये म्हणून गाडीत बसवल्या तरुणी...
- अलवरमध्ये झालेल्या कारवाईत अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेचे उपाध्यक्ष अशोक जोशी यांचाही समावेश आहे.
- अशोक जोशी यांनी पोलिसांना सांगितले की, रुपये सुरक्षित करण्यासाठी दिल्लीला घेऊन जात होते. पोलिसांना आमच्यावर संशय येऊ नये म्हणून पाच तरुणींना कारमध्ये बसवले होते.
- नाकाबंदीदरम्यान पोलिस प्रत्येक गाडीचे तपासणी करत होते. अशोक जोशी यांच्या कारसह इतर तीन कारमध्ये नोटा भरलेल्या बॅग आढळून आल्या.
- पोलिसांनी 1 कोटी 32 लाख 43 हजार रुपये जप्त करून आयकर विभागाला याबाबत सूचना दिली आहे.

पुढील स्लाइडवर पाचा, पोलिसांनी केलेल्या कारवाईचे फोटो.... नवव्या स्लाइडवरील व्हिडिओत पाहा...तरुणींच्या मदतीने घेऊन जात होते दीड कोटी रुपये...
बातम्या आणखी आहेत...