आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Five HM Militants Killed In Encounter With Security Forces

हिजबुल मुजाहिदीनच्‍या 5 दहशतवाद्यांना जवानांकडून कंठस्‍नान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर- काश्मिरमधील गंडेरबल जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या चकमकीदरम्यान सुरक्षा दलाच्या जवानांनी हिजबूल मुजाहिद्दीनच्या पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या दहशतवाद्यांपैकी एकही जण भारतीय नसल्‍याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 24 राष्ट्रीय रायफल्स आणि पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी गंडेरबल जिल्ह्यातील प्रेंग भागात दहशतवाद्यांविरुद्ध सुरु असलेल्‍या मोहिमेदरम्‍यान ही कारवाई कण्‍यात आली. हिजबूल मुजाहिद्दीन संघटनेच्या कादरी असदुल्ला समूहातील पाच अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले. श्रीनगरपासून 65 किमी. गंडेरबल जिल्ह्यातील नजवान जंगलात ही कारवाई करण्यात आली. दहशतवाद्यांना शस्‍त्रे टाकून आत्‍मसमर्पण करण्‍यास सुरक्षा दलांनी सांगितले होते. परंतु, त्‍यांनी गोळीबार सुरु केला. जवानांनी त्‍यांना जोरदार प्रत्‍युत्तर दिले. या चकमकीत पाचही दहशतवादी ठार झाले. मारल्या गेलेल्या अतिरेक्यांची ओळख पटवण्याचे काम अद्याप सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, एकही जण भारताचा नागरिक नसल्‍याचे स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे.