आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ 152 रुपयांत मिळणार 5 kg चे सिलिंडर, गॅस कार्डची कटकट मिटणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छतीसगढमध्ये पाच किलोचे गॅस सिलिंडर पहिल्यांदाच पेट्रोलपंपांवर मिळणार आहे. ही योजना आजपासून सुरू होणार आहे. इंडियन ऑईल कंपनीने राज्यात सर्वात आधी ही सुविधा सुरू केली आहे. इंडियन ऑईलच्या पेट्रोलपंपांवर 152 रुपयांत हे सिलिंडर मिळणार आहे.

पाच किलोच्या सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी कंपनीने ही योजना सुरू केली आहे. इंडियन ऑईलनंतर बीपीसीएल आणि एचपीसीएल कंपन्याही पेट्रोलपंपांवर ही योजना सुरू करणार आहेत.

या दोन्ही कंपन्या या महिन्याच्या शेवटपर्यंत ही योजना सुरू करतील अशी आशा आहे. त्यानंतर कोणत्याही वेळी तुम्हाला छोटे सिलिंडर मिळेल. या योजनेचा फायदा कुटुंबाबाहेर राहणाऱ्या व्यक्तींना अधिक होईल. कुठलेही अतिरिक्त शुल्क न भरता आता हे सिलिंडर मिळेल. यामध्ये गॅस कार्डची कटकट मिटणार आहे.


कसे मिळणार हे सिलिंडर वाचण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...