आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Five Killed In Rohtak As Jat Quota Agitation Turns Violent

हरियाणा : जाट आरक्षण भडक्यात आणखी 5 मृत्यू, 30 हजार लोक अडकले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पानिपत/राेहतक - आरक्षणाचे आश्वासन मिळूनही हरियाणात जाट आंदोलन सुरूच राहिले. यात आणखी ५ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत १६ जण ठार झाले असून आता आंदोलनाने जाट विरुद्ध बिगर जाट असे जातीय रूप घेतले आहे. याचा परिणाम दिल्ली व उत्तर प्रदेशापर्यंत झाला. दिल्लीत पाणीपुरवठ्यासाठी सोनिपतमध्ये लष्कराला गोळीबारही करावा लागला.

दिल्लीपासून उत्तर प्रदेशपर्यंत
- ३० हजारहून अधिक लेाक अडकले. शेकडो वाहने, दोन स्टेशन, बसस्थानक, बँका व अडीचशे दुकाने जाळली. ७३६ रेल्वे रद्द करण्यात आल्या.
- संरक्षणमंत्री पर्रीकर यांची लष्करप्रमुख सुहाग यांच्याशी चर्चा. १२ तासांत महामार्ग खुला करण्याचे आदेश दिले.
- लष्कराच्या ९, निमलष्करी दलाच्या ४९ तुकड्या, ५ हजार पोलिस रस्त्यांवर.
- रात्री उशिरा आंदोलन निवळू लागले. जीटी रोड खुला करण्यात आला.
- जाट संघर्ष समितीचे नेते जयपालसिंह-गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट. मागण्या मान्य, आंदोलन मागे घेण्याचे आवाहन.
- दिल्लीत ६० टक्के पाणीपुरवठा खंडित, जपून वापरा : आवाहन.
- २० हजार कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज.

पुढे वाचा, जाट लोकांचे हीरोदेखील हिंसेविरुद्ध....