आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेणी कापल्याच्या संशयावरुन जमावाकडून 5 जणांना मारहाण; उपचारापूर्वीच महिलेचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साहेबगंज (झारखंड)- वेणी कापल्याच्या संशयावरुन झारखंडमध्ये जमावाने 5 भिकाऱ्यांना जबरदस्त मारहाण केल्याने यातील एका महिलेचा मृत्यू झाला आहे. जमावाला रोखण्याचा प्रयत्न करणारा पोलिस उपनिरिक्षकही या घटनेत जखमी झाला आहे. पोलिसांनी या ठिकाणी गस्त वाढवली आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, औरंगाबादमध्ये वेणी कापल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
 
नेमके काय घडले
- गावात एका मुलीची वेणी कापण्यात आल्याची घटना घडली होती. त्यामुळे गावात तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी या 5 भिकाऱ्यांविषयी गावकऱ्यांना माहिती कळाली.
- गावकऱ्यांना शंका होती की ते वेणी कापणारे आहेत. त्यानंतर त्यांनी या 5 भिकाऱ्यांना दांडक्याने मारहाण केली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी आले आणि भिकाऱ्यांची जमावाच्या ताब्यातून सुटका केली. त्यांना रुग्णालयात दाखल केले.
- रुग्णालयात दाखल करत असतानाच या महिलेला मृत घोषित करण्यात आले. जमावाने एका 9 वर्षाच्या मुलालाही मारहाण केली. तोही जखमी झाला आहे.
 
हेही वाचा
पुढील स्लाईडवर पाहा या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ
बातम्या आणखी आहेत...