यमुनानगर(अम्बाला) - मधू कॉलनीमधील अनिल खेडा प्रमोशनच्या आनंदात आपल्या परिवारासोबत फिरायला गेले होते. परंतु त्यांच्या आनंदावर विर्जण पडले. आनंदाच्या भरात गाडीवरील ताबा सुटून गाडी कॅनॉलमध्ये पडली. त्यातच संपुर्ण परिवारातील सदस्यांचा मृत्यू झाला.
चहावाल्याने दिली माहिती
अनिल खेडाचा परिवारासह घरी न परतल्यामुळे अनिलचा भाऊ हरीशने शोधाशोध सुरु केली. त्याने हॉस्पीटल, मंदीर, गुरद्वार येथे शोधाशोध केल्यानंतर रात्री दीडच्या सुमारास यमुना घाटावरील चहा विक्रेत्याने अपघात घडल्याची बातमी दिली. त्यावरुन मयतांचा शोध घेण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल खेडा(45), पत्नी चंचल(43), मुलगी तान्या(15) मुलगा हर्षित (11) भाची आहना यांचा कॅनॉलमध्ये बुडून मृत्यू झाला.
पुढील स्लाइडवर पाहा, अपघाताची छायाचित्रे