(फोटो- एका असहाय युवतीवर सामूहिक बलात्कार करणारे नराधम)
हैदराबाद- अगदी माणुसकीला काळिमा फासणारी घटना. यापेक्षा मोठा गुन्हा कोणता असावा. जल्लादांनाही लाजवणारा हा प्रकार नुकताच उघडकीस आला. तोही व्हॅट्सअॅपच्या माध्यमातून. पाच जणांनी एका असहाय तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. यावेळी ती सोडण्यासाठी गयावया करीत होती. पाच जणांच्या पाया पडत होती. त्यांच्यासमोर सोडण्याची भीक मागत होती. पण हे नराधम अत्याचार करीत होते. एवढेच नव्हे तर त्याचे त्यांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. यात पाचही जण मोठमोठ्याने हसताना दिसून येतात. बलात्कार अगदी साजरा करताना दिसून येतात. त्यानंतर त्यांनी ते रेकॉर्डिंग व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून इतर मित्रांना शेअर केले.
सुमारे सहा महिन्यांपूर्वी हा सामूहिक बलात्कार झाला असावा. हैदराबादमध्ये एक समाजसेवी संस्था चालवत असलेल्या सुनिथा कृष्णन यांना हा व्हिडिओ सापडला. त्यानंतर गुन्ह्याला वाचा फुटली. यासंदर्भात सुनिथा म्हणाल्या, की हा व्हिडिओ केवळ दहा सेकंद बघितल्यावर मी तो लगेच बंद केला. मला जराही राहवले नाही. एवढा घृणास्पद प्रकार यात दिसत होता. माझ्या एका सहकाऱ्याला हा व्हिडिओ मिळाला. त्यानंतर त्याने तो मला दाखवला होता.
15 वर्षांच्या असताना सुनिथा यांच्यावरही सामूहिक बलात्कार झाला होता. आठ लोकांनी त्यांच्यावर तेव्हा अत्याचार केला होता. सुनिथा म्हणाल्या, की पीडित मुलीने पोलिस तक्रार दिली तरी पुरावे मिळत नाहीत. मुलीला मदत करायला इतर लोक पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे अशा मुली पुढे येत नाहीत.
सुनिथा यांनी व्हिडिओ बघितल्यावर
आपल्या मोबाईलमध्ये घेतला. त्यांचे पती फिल्ममेकर आहेत. त्यांना हा व्हिडिओ एडिट करुन मुलीचा चेहरा लपवायला लावला. त्यानंतर नराधमांना पकडण्यासाठी व्हिडिओ जाहीर केला. सुनिथा यांनी हा व्हिडिओ युट्यूबवर पोस्ट केला आहे. याचे एक राष्ट्रीय कॅम्पेन व्हावे आणि नराधमांना पकडण्यात यावे, अशा त्या म्हणाल्या.
यासंदर्भात मी मीडियाशी बोलल्यानंतर माझ्या कारवर दगडफेक करण्यात आली. यावरुन अशा स्वरुपाचे गुन्हेगारी कृत्ये करणारे किती सक्रिय आहेत हे दिसून येते, असे त्यांनी सांगितले.
बलात्कार करणाऱ्या पाच जणांसंदर्भात काही माहिती असल्यास sunitha_2002@yahoo.com या ईमेवर संपर्क साधण्याचे आवाहन, सुनिथा यांनी केले आहे.
पुढील स्लाईडवर बघा, मीडियाशी बोलल्यानंतर सुनिथा यांच्या गाडीवर अशी दगडफेक करण्यात आली...
सौजन्य- एनडीटीव्ही