पाटणा - निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम बुधवारी जाहीर केला. निवडणूक पाच टप्प्यांत होणार असून पहिला टप्पा १२ ऑक्टोबर रोजी सुरू होईल. अंतिम टप्प्यातील मतदान ५ नोव्हेंबर रोजी होईल, तर मतमोजणी ८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी आदर्श आचारसंहिता तत्काळ लागू झाल्याचे जाहीर केले. एकणू २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेचा कार्यकाळ २९ नोव्हेंबर रोजी संपत आहे.
निवडणूक आयोगानुसार, मतदानाचा पहिला टप्पा १२ ऑक्टोबर, दुसरा टप्पा १६ ऑक्टोबर, तिसरा टप्पा २८ ऑक्टोबर ,चौथा टप्पा एक नोव्हेंबर आणि पाचवा व शेवटचा टप्पा पाच नोव्हेंबर रोजी होणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी बिहार निवडणुकीची घोषणा करताना सांगितले की, बिहारमध्ये एकूण ६ कोटी ६८ लाख मतदार आहेत. एकूण २४३ मतदारसंघांसाठी निवडणूक होईल. सणांच्या तारखा पाहता निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. केंद्राकडून संपूर्ण सुरक्षा यंत्रणा राबवली जाईल. ३८ पैकी २९ नक्षलप्रभावित जिल्हे आहेत. त्यामुळे सुरक्षेची विशेष व्यवस्था आहे.
पुढील स्लाइडवर वाचा टप्पे आणि मतदार संघ....