आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झारखंड: पाच पोलिस अधिकार्‍यांकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची- रांचीपासून जवळच असलेल्या खूंटी जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीवर चार पोलिसांसह एक सीआरपीएफच्या अधिकार्‍याने सामूहीक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पीडित मुलगी 10 वर्षाची असून ती पो‍लिसांसाठी एसपीओचे काम करत होती. पीडित मुलीने सांगितले, की तिला देवेंद्र नामक एका व्यक्तीने जानेवारी 2011 मध्ये पोलिसांची एसपीओ बनवले होते.

खूंटी जिल्ह्यातील तीन पोलिस ठाण्‍यातील (अडकी, रनिया, तमाड) येथील पोलिस निरीक्षक, सीआरपीएफचा एक अधिकारी आणि दलबंगा पोलिस (सरायकेला) ठाण्यातील एका निरीक्षकाने तिचे वारंवार लैंगिकशोषण केले असल्याचे पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पाचही जण तिच्यावर फेब्रुवारी 2011 पासून बलात्कार करत होते. या पोलिसांचे नाव पीडित मुलीना माहित नसून देवेंद्र नामक व्यक्तिच तिला त्यांच्याकडे घेऊन जात होता. देवेंद्रकडे पिस्तूल होती. तो नेहमी तिला जिवे मारण्‍याची धमकीही देत होता.

या प्रकरणी अखेर 'त्या' पोलिसांविरुद्ध रांची येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिस देवेंद्रचा शोध घेत आहे. पोलिसांठी आरोपींवर ठोस कारवाई न केल्यास न्याय मिळवण्यासाठी कोर्टात जाणार असल्याचे शशिभूषण पाठक यांनी इशारा दिला आहे.पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा... माओवाद्यांच्या सांगण्यावरून तक्रार...