आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Five Policemen And Two Civilians Killed In Naxal Attack At Jharkhand

झारखंडमध्ये नक्षलवादी हल्ला: पेरु-लिंबू खाणे सात पोलिसांच्या जीवावर बेतले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची/पलामू- झारखंडमध्ये पलामू बुधवारी झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात पोलिसांचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. पेरु-लिंबू खाणे पोलिसांच्या जीवावर बेतल्याची माहिती समोर आली आहे.

सर्च ऑपरेशन संपवून परतणारे पोलिसांचे पथक बुधवारी सायंकाळी पलामू गावात बराच वेळ थांबले होते. बहुतांश वेळ त्यांनी पेरु व लिंबू तोडण्यात घालवला होता. अंधार पडला तरी पोलिस गावात पेरु खात बसले होते. यादरम्यान, नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यात सात पोलिस कॉन्स्टेबल शहीद झाले.

जखमी पोलिस कॉन्स्टेबलने मान्य केली चूक...
- नक्षलवादी हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिस कॉन्स्टेबलने चूक मान्य केली. नक्षलवादी हल्ल्याचा पोलिसांचा हलगर्जीपणाच कारणीभूत ठरल्याचेही त्याने सांगितले.
- सहा जख्मी पोलिस कॉन्स्टेबलवर रांचीच्या मेडिका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
- पेरु खाण्यात वेळ घालवला नसता तर कदाचित हा हल्ला झाला नसता, असेही जखमी कॉन्स्टेंबलने सांगितले.

बुधवारी सायंकाळी नेमकी झाले तरी काय?
- चोरपहरा गावात पोलिस पथक पोहोचले तेव्हा ठाण्याचे प्रभारी राजेश प्रसाद रजक गावकर्‍यांसोबत चर्चा करू लागले. रजक गावकर्‍यांचा समस्या जाणून घेत होते.
- चौकीदारसह काही कॉन्स्टेबल्सनी पेरु व लिंबू तोडले. अंधार पडला तरी पोलिस पथक चोरपहरा गावातच होते. रात्री गावात थांबण्यावर देखील चर्चा झाली होती.
- मात्र, पोलिस जवान पेरुवर मीठ टाकून खाण्यात मग्न होते. अचानक गावातून निघण्याचा निर्णय घेण्यात आला.
- पोलिस कोणत्या मार्गाने जाणार, हे सगळ्यांनाच माहीत झाले होते.
- चोरपहरा येथे भोजन केल्यानंतर पथक काला पहाडच्या दिशेने निघाले होते. सायंकाळी सात वाजता नक्षलवाद्यांनी पोलिस पथकावर पाळत ठेवून त्यांना टार्गेट केले.
- डीएसपी नसरुल्ला खान यांनी दिलेल्या निर्देशावरुन बुधवारी पहाटे पाच वाजता पोलिस पथक गाडीने विश्वसिया गावात पोहोचले होते.
- तेथून ते पायी काला पहाड येथे गेले. जवानांनी सांगितले की, या भागात माओवादी व जेपीसीच्या नक्षलवाद्यांसोबत चकमक झाली. काही माओवादी ठार मारले गेले. त्यांचे मृतदेह तिथे पडले आहेत.
-ठाणे प्रभारी जिप्सीतून पुढे निघाल्यानंतर जवानांची व्हॅन सूरूंग स्फोटाने हवेत फेकली गेली.
- स्फोटानंतर दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. जखमी जवानांनी त्यांना प्रत्युत्तरही दिले.

पुढील स्लाइडवर पाहा, झारखंडमधील नक्षलवादी हल्ल्याचे फोटो व व्हिडिओ..