आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोळसा खाणीतील ब्लास्टिंगमध्ये पुरुषांची मक्तेदारी, पाच महिलांना परंपरा मोडीत काढण्यात आले यश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर/ वैकुंठपूर - कोळसा खाणीत जास्त जोखमीचे काम मिळू नये अशी पुरुषांचीही इच्छा असते. स्फोट घडवण्याचे (ब्लास्टिंग) धोकादायक काम पुरुषांनाच दिले जाते. मात्र, छत्तीसगडमध्ये पहिल्यांदाच पाच महिला मजुरांनी ही परंपरा खंडित केली. साऊथ ईस्ट कोल फील्ड लिमिटेडच्या चिरमिरी ओपन कास्ट माइन्समध्ये त्या दहा वर्षांपासून ब्लास्टिंगचे काम 
करत आहेत.  

पतीच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर कंपनीत काम मिळाल्यानंतर महिला मजुरांनी पहिल्यांदाच कामासाठी घराचा उंबरठा ओलांडला. व्यवस्थापनाने त्यांना प्रशासनात सामावून घेतले, मात्र त्यांनी पती करत असलेल्या ब्लास्टिंगच्याच कामात रस दाखवला. व्यवस्थापनाने सुरुवातीस नकार दिला, मात्र नंतर त्यास संमती द्यावी लागली. सर्वजणी ४५ ते ६० या वयोगटातील असून निरक्षर आहेत.  

हिरामती म्हणाली, २००७ मध्ये पतीचे निधन झाले. त्यानंतर मुलांची जबाबदारी माझ्यावर आली. पती नसल्यानंतर पहिल्यांदाच कामासाठी बाहेर पडावे लागले. कसे होईल अशी मनात भीती होती. मुलांना तर शिकवायचे होते, त्यामुळे पुढे सरसावले. पती अनेकदा ब्लास्टिंग वेळेसच्या घटना सांगत असत. नोकरी मिळाल्यानंतर त्यांचे काम करू, असा निश्चय केला. सुरुवातीस शिपाई केले. मात्र एके दिवशी अधिकाऱ्यांसमोर ब्लास्टिंगचेच काम करण्याची इच्छा व्यक्त केली. सर्व हसले, मात्र मी माघार घेतली नाही. प्रशिक्षण मिळाले. तांत्रिक भाषा समजत नसल्याने एकमेकांचे बघून शिकले. आता दोन्ही मुलींची लग्ने लावली असून मुलगा महाविद्यालयात शिकत आहे.  

भगीरथी म्हणाल्या, इथे महिलांची संख्या मोठी अाहे. फाइल इकडून तिकडे देणे, बेल वाजल्यानंतर अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये जाणे एवढीच कामे महिलांना मिळतात. मी हे करू शकत नव्हते. त्यामुळे ब्लास्टिंगचे काम करण्याचा निर्णय घेतला. नोकरी मनापासून केली. आता या वर्षी निवृत्त होत आहे.