आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेजारी टीव्ही पाहायला गेली चिमुकली, घरी आल्यावर आईला दिसले शेजाऱ्याने केलेले 'कृत्य'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिमुकलीला नालंदाच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. - Divya Marathi
चिमुकलीला नालंदाच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नालंदा - बिहारच्या नालंदामध्ये एक 5 वर्षीय चिमुकली रोजच्या सारखी शेजाऱ्याच्या घरी टीव्ही पाहायला गेली. शेजाऱ्याने तिच्यावर बळजबरी केली. चिमुकली घरी परतली तेव्हा आईने पाहिले की तिच्या शरीरातून रक्त निघत आहे. ही घटना गुरुवारी नालंदाच्या गिरियाक परिसरातील दुर्गापूरमध्ये घडली.
 
थांबत नव्हते रक्त...
- चिमुकलीचे वडील म्हणाले- माझी मुलगी नारायण महतोच्या घरी जायची, पण मला माहिती नव्हते तो असे दुष्कृत्य करेल.
- गुरुवारी दुपारी चिमुकली नारायण महतोच्या घरातून आली. तिच्या आईने पाहिले की तिच्या शरीरातून रक्त निघतेय. यानंतर आम्ही लगेच तिला हॉस्पिटलमध्ये नेले.
- मुलीची आई म्हणाली की, माझ्या मुलीच्या शरीरातून निघणारे रक्त थांबत नाहीये. आरोपीने मुलीसोबत घाणेरडे काम केले.
- अतिरक्तस्रावामुळे मुलीची प्रकृती चिंताजनक झाली आहे. तिला उपचारांसाठी नालंदाच्या खासगी दवाखान्यात भरती करण्यात आले आहे.
- पोलिसांनी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक केली आहे. पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलिस म्हणाले.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज....
बातम्या आणखी आहेत...