आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Flash Floods After Cloudburst In Jammu And Kashmirs Baltal 2 Children Killed

J&K: ढगफूटीनंतर आलेल्या पूरात दोन मुलांचा मृत्यू, अमरनाथ यात्रेवरही परिणाम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बालटालमध्ये ढगफूटी झाल्यानंतर परिसरात पाणी साचले. - Divya Marathi
बालटालमध्ये ढगफूटी झाल्यानंतर परिसरात पाणी साचले.
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटीमुळे आलेल्या पूरात दोन मुलांचा मृत्यू झाला आहे, तर नऊ जण जखमी आहेत. खोर्‍यातील बालटाल परिसरात ढगफुटी झाली. त्यानंतर बालटालमधील बेस कँपमध्ये पाणी शिरले. त्यामुळे अमरनाथ यात्रेवरही परिणाम झाला आहे. ढगफुटीमुळे एक पुल, दोन लंगर आणि एका राहुटीचे नुकसान झाले आहे. श्रीनगर - लेह राष्ट्रीय महामार्ग देखील बंद करण्यात आला आहे.

780 जणांची केली सुटका
शनिवारी सकाळी बालटाल भागात 780 जणांची बचाव पथकाने मदत केली. त्यात काही अमरनाथ यात्रेकरू देखील होते. सुरक्षा रक्षक आणि एसडीआरएफचे जवान बालटाल भागात मदतीसाठी दाखल झाले आहेत. त्यांनी अनेकांची पूरातून सुटका केली आहे. काही भागात भू-स्खलन झाले आहे. गेल्या आठवड्यात कुल्लन-गगनगीर येथे ढगफुटी झाली होती. त्यात सहा जण ठार झाले होते. तेव्हा श्रीनगर - लेह राष्ट्रीय महामार्ग बंद होता.

अजूनही 11 जण बेपत्ता
पूरामुळे गांदरबल जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. अजूनही 11 जण बेपत्ता आहेत. मध्य काश्मिरच्या गांदरबल जिल्ह्यात पोलिसांच्या माहितीनूसार, शनिवारी सकाळी दोन मुलांचे मृतदेह सापडले. मुलगी साधाराण १३ वर्षांची तर मुलगा १२ वर्षांचा आहे.
पूराच्या पाण्यामुळे पूल वाहून गेला
बालटालच्या वरच्या बाजूला जोजिला टॉप येथून वाहाणारा नाला बालटाल बेस कँपपासून वाहतो आणि खाली असलेल्या नदीत मिसळतो. ढगफुटीमुळे नाल्यात पूराचे पाणी साचले आहे. नाल्याजवळच सीआरपीएफ, लष्कर आणि पोलिसांचे अस्थायी कँप आहेत. नाल्याच्या पाण्यामुळे त्यावरील पूल वाहून गेला आहे. त्यामुळे दोन लंगर आणि राहुट्यांचे नुकसान झाले आहे. बालटाल येथे जुन्या हेलिपॅडवर लावण्यात आलेल्या राहुट्या देखील उद्घवस्त झाल्या आहेत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, बालटाल येथील ढगफुटी