आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: झारखंडमध्ये राजभवनसमोर खुलेआम वेश्याव्यवयाय; पोलिसांचा कानाडोळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची- झारखंडची राजधानी रांचीमध्ये वेश्याव्यवसायाला ऊत आला आहे. रांचीमधील बहुतांश हॉटेल, पार्लरमध्ये खुलेआम वेश्याव्यवसाय सुरु आहे. एवढेच नव्हे तर राज्यपालांच्या निवासस्थानासमोर सर्रास वेश्याव्यवसाय सुरु आहे. मात्र, याकडे पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राजभवनाच्या मुख्यप्रवेशद्वाराजवळ दररोज डझनभर तरुण‍ी- महिला ठाण मांडतात. ग्राहक येतात, सौदा ठरतो आणि तरुणी- महिलांना नियोजित ठिकाणी घेऊन जातात. राजभवनाजवळ जमा होणार्‍या तरुणी-महिलांचे वर्तन फारच वाह्यात असते. रस्त्यावरून जाणार्‍या- येणार्‍यांना आकर्षित करण्‍यासाठी तरुणी- महिला विचित्र हावभाव करतात. मात्र, आतापर्यंत पोलिसांनी आतापर्यंत त्यांच्यावर कारवाई का केली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक पोलिसांना याबाबत संपूर्ण कल्पना आहे. परंतु, पोलिसांना दलालांकडून 'चिरीमिरी' वेळेत पोहोचत असल्याने त्यांनी याप्रकाराकडे कानाडोळा केला आहे.

'भास्कर जर्नलिस्ट'ने आपल्या कॅमेर्‍यात रांचीमधील राजभवनासमोर खुलेआम सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाला कैद केले आहे. पुढील स्लाइड्‍सवर पाहा छायाचित्रे...