आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तराखंडमध्ये भाविकांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळले, इंजिनिअरचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेहराडून/ नवी दिल्ली- उत्तराखंडमध्ये भाविकांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर शनिवारी बद्रीनाथहून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळेतच दुर्घटनाग्रस्त झाले. त्यात चालक दलातील एका अभियंत्याचा मृत्यू झाला, तर दोन पायलट जखमी झाले. हेलिकॉप्टरमधील पाचही भाविक सुरक्षित आहेत.  चमोलीच्या पोलिस अधीक्षक तृप्ती भट्ट यांनी सांगितले की, अभियंता विक्रम लांबा हेलिकॉप्टरच्या पंख्यात अडकले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. ते आसामचे रहिवासी होते. या भागात हवेचा पुरेसा दाब नसल्यामुळे उड्डाण घेतल्याबरोबर पायलटचे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटले आणि ते कोसळले.
बातम्या आणखी आहेत...