आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लिपकार्टने उभारले ४४०० कोटी रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू देशातीलसर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने गुंतवणूकदारांकडून ७० कोटी डॉलर (सुमारे ४,४०० कोटी रुपये) जमवण्यात यश मिळवले आहे. या सौद्यानंतर फ्लिपकार्टचे मूल्यांकन ११ कोटी डॉलर (६९,००० कोटी रुपये) झाले आहे. मूल्यांकनाच्या दृष्टीने ही कंपनी सर्वात मोठ्या कंपन्या डाबर गोदरेज कंझ्युमरपेक्षा मोठी झाली आहे. नुकत्याच संपलेल्या शेवटच्या आठवड्यात डाबर गोदरेज कंपन्यांचे मार्केट कॅप अनुक्रमे ४० हजार ३१,४०० कोटी रुपये इतके आहे. सात वर्षे जुन्या फ्लिपकार्टमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांत नवे आणि जुने गंुतवणूकदार आहेत. कंपनी याआधी या वर्षी १.२ अब्ज डॉलर (७,५०० कोटी रुपये) जमा केले आहेत. ई-कॉमर्स क्षेत्रातील दुसरी मोठी कंपनी स्नॅपडीलनेही या वर्षी अब्ज डॉलर (६,३०० कोटी रुपये) जमवले आहेत.

यात जपानच्या सॉफ्ट बँकेकडून ६२.७ कोटी डॉलरचा (३९५० कोटी रुपये) समावेश आहे. अमेरिकन कंपनी अॅमेझॉनने भारतात दोन अब्ज डॉलर (१२,६०० कोटी रुपये) गंुतवणूक करण्याची घोषणा याआधीच केली आहे.

फ्लिपकार्टचे मूल्यांकन
६९,००० कोटी रुपये(११ अब्ज डॉलर)
या डीलनंतर इतके झाले
भारतात ई-कॉमर्स
१५,००० कोटी रुपये भारताचा सध्याचा ई-बाजार
२.७ लाख कोटी रुपये होणार २०१८ पर्यंत नोमुराच्या आकलनानुसार