आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारच्या 12 जिल्ह्यांत पूर, नेपाळच्या 5 नद्यांमधून आले 300% जास्त पाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे छायाचित्र बिहारच्या अररिया जिल्ह्याचे आहे. येथे एक व्यक्ती केळाच्या खोडाच्या नावेवर धान्य घेऊन निघाला आहे. - Divya Marathi
हे छायाचित्र बिहारच्या अररिया जिल्ह्याचे आहे. येथे एक व्यक्ती केळाच्या खोडाच्या नावेवर धान्य घेऊन निघाला आहे.
पाटणा/भागलपूर/मुजफ्फरपूर/लखनऊ/गुवाहाटी- देशात बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, आसामसह १० राज्यांत पुराने थैमान घातले आहे. नेपाळच्या तराई भागात गेल्या चार दिवसांपासून होणाऱ्या पावसाने बिहारमध्ये जलप्रलय आला आहे. तेथे गंगा, कोसी, महानंदा नदीला पूर आहे. बिहारच्या किशनगंज, पूर्णिया, अररिया, कटिहार, पश्चिम चंपारण, सहरसा आणि सुपौलसह १२ जिल्हे पुराचा सामना करत आहेत. त्यापैकी ७ जिल्ह्यांत तर सामान्य वृष्टी झाली आहे. ४० लाख लोक पुराच्या तडाख्यात आहेत. रेल्वे, वीज आणि दूरसंचार सेवा ठप्प आहे. लष्कर, एनडीआरएफ, हवाई दलाने बचाव मोहीम हाती घेतली आहे. उत्तर बिहार-बंगालमध्ये पुरामुळे किशनगंज-सिलीगुडी रेल्वे मार्ग ठप्प झाला आहे. ईशान्येच्या आठ राज्यांचा उर्वरित भारताशी रेल्वे संपर्क तुटला आहे.
 
कारण? बिहारजवळील नेपाळमध्ये १० पट जास्त पाऊस
हवामान तज्ज्ञांच्या मते, नेपाळने पाणी सोडले हे बिहारमधील पुराचे मुख्य कारण आहे. हे पाणी नेपाळमधून वाहणाऱ्या कोसी, घाघरा, गंडक, कमला आणि बागमती या पाच नद्यांंमधून बिहारमध्ये येते. गेल्या ३-४ दिवसांपासून नेपाळमध्ये सामान्यपेक्षा ३ ते १० पट जास्त पाऊस झाला आहे. नेपाळमध्ये प्रचंड पावसानंतर वाल्मीकीनगर गंडक बांधातून सुमारे १० लाख क्युसेक पाणी सोडले आहे. त्याशिवाय पूर्वांचलमध्येही मोठा पाऊस होत आहे. त्यामुळे बिहारच्या पूरप्रभावित भागात सामान्य पावसापेक्षा ३००% जास्त पाणी नेपाळमधून आले आहे.

देशात सामान्यपेक्षा ३ टक्के कमी पाऊस, द. भारतात १७ टक्के कमी
देशात सामान्यापेक्षा तीन टक्के कमी पाऊस पडला आहे. दक्षिणते १७ अक्के तर मध्य भारतात ७ टक्के कमी पाऊस पडला. तथापि, सुमारे १० राज्यांमध्ये पूरपरिस्थिती आहे. पूर्वोत्तर भारत, बिहार, आणि उत्तर प्रदेश सर्वाधिक प्रभावित आहेत.

उत्तर प्रदेश: गोरखपूर, गोंडा आणि बहराइचसह १८ जिल्ह्यात पूर
उत्तर प्रदेशात बिहार-नेपाळ सीमेवर ७२ तासांपासून पाऊस सुरू आहे. गोरखपूरमध्ये २४ तासांत १८० मिमी पाऊस पडला. १० वर्षांचा विक्रम मोडला. उत्तर प्रदेश- बिहारमध्ये सुमारे ३० रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. गोरखपूर, गोंडा आणि बहराइचसह १८ जिल्ह्यात पूरपरिस्थिती आहे.
 
आसाम: ३० वर्षांचा विक्रम मोडीत, ७० टक्के भागांत पाणी
ब्रम्हपुत्र नदी दुसऱ्यांदा दुथडी वाहतेय. यामुळे १० जणांचा मृत्यू झाला. राज्याच्या ७० टक्के भागांत पाणी आहे. यंदा पावसाने ३० वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे.
 
उत्तराखंड: कैलास मानसरोवर मार्गावर ढगफुटी, चार ठार
पिथौरगड जिल्ह्यात कैलास मानसरोवर मार्गावर सोमवारी पहाटे ढगफुटीमुळे ३ जवानांसह चौघे ठार झाले असून ६ जण बेपत्ता आहेत.

पुढील स्‍लाइडवर...देशातील पावसाची स्थिती...
 
 
 
बातम्या आणखी आहेत...