आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Flood In Arunachal Pradesh. Landslide In Phamla Village Of Tawang District

अरुणाचलमध्ये 80 घरे पुरात गेली वाहून; कुठे उष्णता तर कुठे पुरस्थिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इटानगर- देशात सध्या निसर्गाची दोन रौद्र रूपे दिसून येत आहेत. एका भागात सूर्य जणू आग आेकत आहे तर दुसऱ्या बाजूला काही राज्यांत मान्सूनपूर्व पावसाने लावलेल्या मुसळधार हजेरीत पुराने हाहाकार माजवला. अरुणाचल प्रदेशात नोआ दिहिंग नदीला आलेल्या पुरात ८० घरे वाहून गेली आहेत.

बंगळुरू, आेडिशात विक्रमी तापमान असतानाच अरुणाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे काही भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेकडो लोक बेघर झाली आहेत. डम्पानीमध्ये ६० कुटुंबे, ज्योतीपूर गावात १६ कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. नैसर्गिक संकटातील पीडितांना प्रत्येकी १.२ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे, अशी घोषणा स्थानिक आमदार निख कमिन यांनी केली. आेडिशातील अनेक शहरांत ४० अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. दिल्ली, राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेशात तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवासांपासून दुपारच्या वेळी रस्त्यावर वाहतूक विरळ होऊ लागली आहे. काही शहरांतून अघोषित संचारबंदी असल्याचे चित्र पाहायला मिळू लागले आहे. बिहारसह अनेक राज्यांत उष्णतेमुळे शाळांना अगोदरच सुट्टी जाहीर झाली आहे.पाटण्यात मे पासून सुटी जाहीर करण्यात आली आहे. वास्तविक राज्यात मेच्या तिसऱ्या आठवड्यापासून सुट्टी दिली जाते. परंतु तापमान वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

अनेक भागांत उष्णता
देशातील अनेक भागांत उष्णतामान अधिक असल्याचे नोंदवले गेले आहे. रविवारपासून बंगळुरूमध्ये पारा ४० वर असल्याचे पाहायला मिळत आहे. बंगळुरूमध्ये दशकांचा उष्णतेचा विक्रम मोडला आहे. रविवारी आेडिशातील तितलागडमध्ये ४६ अंश सेल्सियस तापमान होते. देशातील पूर्व दक्षिणेकडील शहरांत कमाल तापमान ४० हून अधिक राहिले. तेलंगणामध्ये उष्माघातामुळे ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. तेलंगणातील करिमनगर, खाम्मन, निझामाबाद जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढल्याने लाहीलाही होऊ लागली आहे.आगामी दोन दिवस उष्णता कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. दिल्लीचे कमाल तापमान ३९ तर किमान २० होते. दुसरीकडे हवामानातील विरोधाभासी वातावरणामुळे आजारांचे प्रमाणही वाढू लागले आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, मणिपूरमध्ये पाऊस