आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरुणाचलात पुराचा कहर, दहा फूट उंच लाटा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इटानगर - अरुणाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. त्याचा सर्वाधिक फटका सुबानसिरी जिल्ह्यातील गावांना बसला आहे. अनेक गावांना पुराने वेढले आहे. काही भागात दरडी कोसळल्या असल्या तरी सुदैवाने जीवित हानी झाली नाही.

सुबानसिरी जिल्ह्यात गुरुवारी रात्री दापाेरिजो, सुबानसिरी नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या अनेक गावांना धोका निर्माण झाला आहे. नदीची पाणीपातळी ६-७ फुटांनी वाढली आहे. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शुक्रवारी पाणीपातळी वाढली होती. िसकारिजो, पगारिजो, िदलीदी, सिप्पी, मेंगा, कुपोरिजो या गावांना पाण्याने वेढले आहे. गेल्या काही िदवसांपासून या भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पासीघाट-पांगीन गावाचा जगाशी असलेला संपर्क तुटला आहे. गेल्या आठ िदवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्या िशवाय िसआंग जिल्ह्याचा राज्याशी संपर्क तुटला आहे. सिप्पी गावातील िचत्र फारच िवदारक आहे. पुराचे पाणी घरांबरोबरच शाळेतही िशरले. रात्रभर पूर होता. त्यामुळे शाळेतील वर्ग आणि विखुरलेली पुस्तके िचखलाने माखलेली िदसून आली. सुबानसिरी भागात १४ ऑगस्टपासून पुराचा कहर सुरू आहे. शुक्रवारी पहाटे २ च्या सुमारास पुराच्या मोठ्या लाटा अनेक घरात घुसल्या. अनेक लोक साखर झोपेत असताना त्यांच्या अंगावर १० फुटांच्या लाटा येऊन आदळल्या. तेव्हा क्षणभर काय झाले, हेच समजले नाही.