आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्‍तराखंड: शवविच्छेदनाचे काम पूर्ण; सामूहिक अंत्यसंस्काराचे मोठे आव्हान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेहराडून- उत्तराखंडमध्ये ढगफुटीनंतर आलेल्या महाप्रलयात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांचे केदारनाथ येथे शवविच्छेदन करण्याचे काम केदारनाथ येथे पूर्ण झाले आहे. त्यांचे डीएनए नमुनेही घेण्यात आले आहे. परंतु आता त्यांच्या पार्थिवांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात स्थानिक प्रशासनाला एक ना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

केदारनाथ आणि गौरीकुंडदरम्यान असलेल्या 14 किमी अंतराच्या मार्गावर मृत्यूमुखी पडलेल्या शंभर लोकांचे सामूहिक अंत्यसंस्कार करण्याची योजना प्रशासनाने आखली होती. परंतु ऐनवेळी इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांनी (आयटीबीपी) मदत करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

उत्तराखंडमधील आपत्ती व्यवस्थापनाचे नोडल अधिकारी संतोष बडोनी यांनी सांगितले की, सात टन लाकूड हेलिकॉप्टरच्या माध्यमातून केदारनाथ-गौरीकुंड परिसरात पोहचविण्याचे प्रयत्न सुरु आहे. तसेच लष्कराचे ध्रुव हेलिकॉप्टर्सच्या मदतीने गोचर येथून लाकूड तसेच तूप आणि पूजा सामुग्री पाठवली जात आहे. परंतु ढगाळ वातावरणामुळे प्रचंड अडचणी येत आहेत. बडोनी यांच्यानुसार केदारनाथ ते गौरीकुंड दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी मृतांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. परंतु स्थानिक प्रशासनाकडून या कामात एकही कर्मचारी पाठवला जात नसल्यामुळे बचाव कामात व्यस्त असलेल्या आयटीबीपीच्या जवानांनीही सामूहिक अंत्यसंस्कारासाठी मदत करण्‍यास नकार दिला आहे.

आयटीबीपीच्या सूत्रांनुसार उत्तराखंड सरकारतर्फे एक अधिकारी अंत्यसंस्कारापूर्व कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी पाठवण्‍यात आला होता. त्याने आयटीबीपीला सामूहिक अंत्यसंस्कारासाठी मदतीचे आवाहन केले होते. परंतु आयटीबीपीने स्पष्ट नकार दिला आहे. मृतांचे अंत्यसंस्कार करण्‍याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची असल्याचेही स्पष्टीकरणही आयटीबीपीतर्फे देण्यात आले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा बचाव कार्याचे छायाचित्रे...