आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसम-बिहारमध्ये पावसाचा तडाखा, 72 ठार, हिमाचलमध्ये अलर्ट, दमणगंगेच्या पुलावर पाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा/गुवाहाटी/ वलसाड/भोपाळ- बिहार, आसाम, गुजरातसह मध्य प्रदेशात दोन दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. या पावसाने 15 नागरिकांचा बळी घेतला आहे. दोन्ही राज्यात मृतांचा आकडा 72 वर पोहोचला आहे.

दुसरीकडे, हिमाचल प्रदेशात तूफान पाऊस सुरु आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. ठिकठिकाणी भूस्खलन झाल्याने 4 राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आले आहे. तसेच राज्यातील छोटे-मोठे जवळपास 150 मार्ग बंद करण्यात अाल्याचीही माहिती मिळाली आहे. मनाली, शिमला, नाहन आणि रामपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

गुजरातमधील वापीजवळून वाहणारी दमणगंगा नदी कोपली आहे. नदीला महापूर आला असून पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. उत्तरेकडून मुंबईकडे येणार्‍या गाड्या उशीराने धावत आहेत.

दरम्यान, गुजरात मधील मुसळधार पावसामुळे दिल्लीहून मुंबईला रवाना झालेली टँल्गो ट्रेन रखडली आहे. ती 3 तास उशीराने पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुढील स्लाइडवर पाहा...देशातील 13 राज्यात संततधार पाऊस... अनेक राज्यात अलर्ट, भोपाळमध्ये शाळा बंद...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...