आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: राजस्थानात हाहाकार, आठ तासांत 197 मिमी पाऊस, रेल्वे ट्रॅक बुडाला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो:सीकरमधील नवलगड रस्त्यावर साचलेले पावसाचे पाणी)
सीकर/जयपूर- राजस्थानातील सीकरसह अनेक जिल्ह्यांना गुरुवारी मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. सीकर शहरात अवघ्या आठ तासांत 197 मिमी (जवळपास 8 इंच) पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. पूरस्थितीसारखी निर्माण झाली आहे. रेल्वे ट्रॅक पाण्यात बुडाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. प्रशासनाने शहरात हायअलर्ट जारी केला आहे.

शहरातील अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरले आहे. घरांमध्ये 4-4 फूटापर्यंत पाणी भरले आहे. गुरुवारी पहाटे चार वाजता सुरु झालेला पाऊस दुपारी 12 वाजेपर्यंत कोसळत होता. संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली होती.

रेल्वे ट्रॅकवर जवळपास अडीच फूट पाणी साचले आहे. सीकर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मपर्यंत पाणी आले आहे. प्रशासनातर्फे हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. तब्बल 35 वर्षांनंतर अशी मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे एका बाजुला शेतकारीवर्ग प्रसन्न दिसत आहे तर शहरीभागातील नागरिकांचा चांगलीच तारांबळ उडाली आहे. अलवर, बीकानेर, चित्तोडगडसह अनेक जिल्ह्यात चांगला दमदार पाऊस झाल्याची माहिती मिळाली आहे. त्याचप्रमाणे शेखावाटी, बीकानेर आणि कोटामध्ये शुक्रवारी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

बेसमेंटमध्ये पाणी भरल्याने युवकाचा मृत्यू
सीकरमध्ये एका घराच्या बेसमेंटमध्ये पाणी भरल्याने युवकाचा मृत्यू झाला आहे. संदीप असे मृत युवकाचे नाव आहे. पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की, बेसमेंटची भिंत तूटून पाणी आत शिरले. संदीपने बाहेर निघण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु त्याचे परिश्रम कमी पडले. त्याचा बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. पंपसेट लावून बेसमेंटमधील पाणी उपसण्यात आले. राज्याच मंत्री अजय सिंह किलक यांनी मृत संदीप यांच्या कुटुंबियांना चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, राजस्थानतील सीकरमध्ये झालेल्या पावसाने नागरिकांची उडवली धांदलीचे फोटो...
(छायाचित्रकार- विशाल सैनी)
बातम्या आणखी आहेत...